दिपूनी गेले नयन त्या क्षणी,
बघता तिची सोज्वळ मूर्ती ।
हाक निघाली अंतःकरणीं,
तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।
जरी बघितल्या अनेक सुंदरी,
ठाव मनाचे हिने जिंकले ।
सहचारीणी ही होईल तुझी,
अंतरमनी शब्द उमटले ।।२।।
अनामिक जे होते पूर्वी,
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ ती येता क्षणी,
ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।
शंका भीती आणि तगमग,
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानुबंधन,
बांधले होते भावबंधनी ।।४।।
उचंबळूनी दाटूनी आला,
ह्रदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले,
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply