नवीन लेखन...

प्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी

जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम यांच्या बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा…. आणि… यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर ‘लता मंगेशकरांनी’ घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन’च’ घेणारा…साहिर लुधियानवी हे आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.

साहिर लुधियानवी यांचे अब्दुल हयी हे मूळ नांव. ‘लुधियाना येथील एका मुस्लिम गुज्जर जमीनदार घराण्यात त्यांचा ८ मार्च १९२१ रोजी जन्म झाला. त्यांची मातृभाषा पंजाबी; त्यांनी ‘ साहिर लुधियानवी/ या टोपणनावाने उर्दू व हिंदी भाषांत गीतलेखन केले. त्यांचे वडील फाझल मुहम्मद हे इंग्रज राज्यकर्त्यांशी पूर्ण निष्ठा बाळगून होते; त्यांचा स्वभाव विलासी व स्वछंदी होता. साहिरांची आई सरदार बेगम ही त्यांची अकरावी पत्नी. ती अत्यंत स्वाभिमानी होती. आपल्या पतीची जीवनशैली तिला मान्य नव्हती.

पतिपत्नीमधील ताणतणाव अखेर विकोपाला जाऊन त्यांनी परस्परांपासून फारकत घेतली. त्या वेळी बाल्यावस्थेत असलेल्या साहिरांचा ताबा न्यायालयाने त्यांच्या आईकडे दिला. ह्या घटनांचा व तणावपूर्ण कौटुंबिक वातावरणाचा साहिरांच्या मनावर खोल विपरीत परिणाम झाला आणि तो आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहिला. आर्थिक विवंचना, सततचे भय व दु:ख अशा वातावरणात साहिरांची जडणघडण झाली. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिर यांनी स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.

साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग साहिर मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहू लागले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेकडो गीते त्यांनी लिहिली. त्यांपैकी प्यासा (१९५७), नया दौर (१९५७), धूल का फूल (१९५९), बरसात की रात (१९६०), फिर सुबह होगी, वक्त, ताजमहाल, हम दोनो(१९६१), गुमराह (१९६३), चित्रलेखा (१९६४), कभी कभी (१९७६) इ. चित्रपटांतील त्यांची गीते रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. ताजमहाल चित्रपटातील ‘जो वादा किया’ या गीतासाठी १९६४ मध्ये आणि कभी कभी चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में’ या गीतासाठी १९७७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून दोन वेळा ‘फिल्मफेअर’चे पुरस्कार मिळाले.

गायक व संगीतकार यांच्या बरोबरीनेच चित्रपटगीतकारांनाही सन्मान, प्रतिष्ठा व स्वामित्वशुल्क मिळावे, यासाठी साहिर यांनी अविरत लढा दिला व गीतकारांना चित्रपटव्यवसायात प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये ‘अमृता प्रीतम’ हे नांव सर्वात वर! अमृता प्रीतम ‘साहिरने ओढलेल्या’ सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की ‘आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार’!

गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. भारत सरकारने साहिर यांना पद्मश्री देऊन सन्मान केला. याशिवाय ‘सोव्हिएट लँड-नेहरु पुरस्कार’ व ‘महाराष्ट्र उर्दू अकादेमी पुरस्कार’ देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. मा.साहिर यांचे निधन २५ ऑक्टोबर १९८० रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..