नवीन लेखन...

साहित्यिक ठाणे – जुने आणि नवे

१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री म. पां. भावे यांनी लिहिलेला लेख

हा लेख १९८८ मध्ये लिहिलेला आहे. तेव्हाच्या साहित्यिकांच्या नावांचाच समावेश आहे. 


साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे. सान्या महाराष्ट्रभर फिरून त्या त्या संतांच्या जन्मग्रामी जाऊन तसेच त्यांच्या नातेवाईकांना भेटून, जुन्या पोथ्या चाळून, ती ती देवालये पाहून त्यांनी जे संशोधन केले ते फारच मोलाचे आहे. ‘महाराष्ट्र सारस्वत’ ग्रंथाच्या पाच आवृत्या निघाल्या यावरूनच या ग्रंथाची मौलिकता लक्षात यावी. त्यांनी ‘महाराष्ट्र कवी’ या नावाचे एक मासिकही चालविले होते. याखेरीज त्यांचा ‘चक्रवर्ती नेपोलियन’ हा चरित्रमय ग्रंथही त्याकाळी खूप लोकप्रिय झाला.

यानंतर प्रामुख्याने लक्षात येते ते नाव म्हणजे राजाराम सखाराम भागवत (३१-८-८५ ते १७-६-६८). लेखन प्रामुख्याने अध्यात्म क्षेत्रातील. ते डोळस व संशोधक प्रवृत्तीचे होते. अध्यात्म क्षेत्रातील ‘तेजस्वी ज्ञानदिवा’ असं जरी त्यांच्या बाबतीत म्हटले तरी ते चूक ठरू नये. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत व असंख्य व्याख्याने देऊन भरीव कार्यही केले. त्यामुळे समकालीनांना अभ्यासाचे दृष्टीने त्यांचे सुयोग्य मार्गदर्शन लाभले. त्यांनी धर्म व अध्यात्म यावर सखोल अभ्यास केला होता. थिऑसॉफी विषयात महाराष्ट्रात त्यांचे नाव अग्रेसर होते. ‘सिद्धपुरुष आणि त्याचा संप्रदाय,’ महा-राष्ट्रातील संत व त्यांचे साक्षात्कार’ ‘ईश्वर आहे की नाही? ‘मनुष्याला आत्मा असतो काय?’ ‘पुनर्जन्म, कर्म, अंतर्ज्ञान, ‘मृत्यू व मृत्यूनंतर’ ‘शाकाहार की मांसाहार’ इत्यादी त्यांच्या पुस्तकाचे विषय पाहिले की या लेखकाच्या ज्ञानाची उंची लक्षात यावी. त्यांनी ‘धर्म जागृती’ नावाचे मासिकही अनेक वर्षे चालविले. रा. स. भागवतही एकापरीने अध्यात्म क्षेत्रातील चालतीबोलती संस्थाच होती. त्यांची १९ पुस्तके, त्याचप्रमाणे १२ छोट्या पुस्तीका अशी ग्रंथसंपदा आहे.

ठाण्यातील दिवंगत लेखकांपैकी सर्व परिचित व उत्तम सुयश लाभलेले लेखक म्हणजे ज. ना. ढगे २५-११-७१ ते ३१-५-८६ ललित वाङ्मयाबरोबर अध्यात्म वाङ्मयाचीही आवड डोकं त्यांची गणित विषयावरील ‘मेंदुला खुराक’ व ‘जरा होती. चालवा’ ही पुस्तके आजही लोकप्रिय आहेत. त्यांची अन्य पुस्तके ‘स्वप्न सृष्टी’ व अध्यात्म नीती विषय’ व ‘अंत-‘जीवन’ ही होत. ‘दुसरा संसार’ या पुस्तकास शासकीय पुरस्कार लाभला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी स्वप्नसृष्टी आणि भूतसृष्टी या विषयावर व्याख्याने दिली आहेत.

प. त्रिं. सहस्रबुद्धे, कादंबरी व कथालेखकही होते. त्यांची ‘प्रहार’ ‘वसुधा’ ‘पहिली सलामी’ ‘जीवनसाथी’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘प्रक्षोभ’ या नाटकावर स्वातंत्र्यपूर्व काळातील सरकारने बंदी घातली होती. तर ‘जीवनसाथी’ छापताना त्यांच्या घरावर सरकारने छापा घालून ८० पाने जप्त केली होती. अखेरी अखेरीस ते ‘वाचनालयाचे’ संपादक ही होते.

वसंतराव कर्णिक, ‘शांतता’ विषयावर फार मोठा प्रबंध लिहिला होता. परंतू तो प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. कविवर्य वसंत वैद्य हे ठाण्यातील एक वादळी व्यक्तिमत्त्व. सुरुवातीच्या काळात त्यांनी भावगीते, दर्यागीते लिहिली, परंतु मनात वैचारिक क्रांती झाल्याबरोबर मुक्त छंदाचा आश्रय घेवून त्यांनी विपुल काव्यलेखन केले. प्रभावी व सडेतोड वक्ते म्हणूनही त्यांची ख्याती होती. ‘साद’ ‘बहर’ हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह. त्याचप्रमाणे ‘गलोल’ ‘पालवी’ ‘पळत्या छाया’, ‘जिरेटोप’ आदि पुस्तके प्रसिद्ध. ‘पेरणीस भारत सरकार पुरस्कार मिळाला तर जळगाव साहित्य संमेलनात उत्तम काव्य गायनाचे सुवर्ण पदकही मिळविले. ‘साद’ या त्यांच्या काव्य संग्रहाला वि. स. खांडेकर यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. ललित लेखनाव्यतिरिक्त कुक्कुटपालनावरही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ठाण्यातील दिवंगत साहित्यिकांविषयीचीही यादी काही नांवाचा किमान उल्लेख केल्याशिवाय संपविता येणार नाही. त्यात नि. गो. पंडितराव यांचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पंडितराव म्हणजे ठाण्यातील साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे व त्यावेळचे एक केंद्रच होते. न्या. राम केशव रानडे, भ. दि. गांगल, राम आठवले, शं. गो. घैसास, व्ही. डी. गांगल, शं. बा. दिक्षीत, जनार्दन करंदिकर, नानासाहेब दामले इत्यादी आणि ‘ऋतुचक्र’ व ‘गारंबीचा बापू’ यांची हिन्दी भाषांतरे करणारे शैलेंद्रसिंग या लेखकांनी ठाण्यातील साहित्य चळवळीस हातभार लावला आहे.

विद्यमान साहित्यिकात कविवर्य पी. सावळाराम हे नाव अग्रक्रमानेच घ्यायला हवे. ‘गंगा-जमुना’ ने पी. सावळाराम कीर्तीच्या अत्युच्य शिखरावर पोहोचले. भावगीते, चित्रपट गीते, लावण्या, भक्ति गीते अशा विविध प्रकारच्या गीतांनी त्यांनी संबंध मराठी मनाला गुंडाळून टाकले आहे. आजही त्यांच्या गीतांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. उलट त्यांच्याच गीतांवर आधारित असा ‘अक्षय गाणी’ हा कार्यक्रम सर्वत्र उत्तम यश मिळवीत आहे. कवी असून नगराध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळविणारे पी. सावळाराम हे एकमेव मराठी कवी आहेत. वसंत प्रभूंसारखा कुशल संगीत दिग्दर्शक, उता-आशा सारखे दोन सुस्वर व भावनेने ओतप्रोत भरलेली भावगीते अशा त्रिवेणी संगमामुळे पी. सावळाराम यांची गीते महाराष्ट्राचा अमोल ठेवा ठरली आहेत.

नयना आचार्य, त्यांना प्रकाशकांचा पुस्तक छपाई व्यवहाराचा आलेला कटु अनुभव ध्यानी घेऊन स्वतःची प्रकाशन संस्था काढली. सुमारे पन्नास कादंबऱ्या, चार सहा कथासंग्रह व अन्य विषयांवरील चारपाच पुस्तके ही त्यांची ग्रंथसंपदा. विषयांची विविधता, लेखनातील सातत्य, पुस्तक विक्रीसाठी स्वतः परिश्रम घेण्याची तयारी, असे त्यांचे काही गुणविशेष.

शाम फडके, हे नाव तर महाराष्ट्राला नाटककार आणि विनोदी लेखक या नात्याने सुपरिचित आहे. ‘तीन चोक तेरा’ने प्रथम त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘काका किशाचा’ ‘बायको उडाली भुर्रर्र’ वगैरे फार्स त्यांनी लिहिले. बालरंगभूमीसाठी त्यांनी ‘एक होतं भांडणपूर’ सारखी नाटके लिहीली. छोट्या नि मोठ्यांची मिळून आज त्यांच्या नावे पन्नास-साठ पुस्तके उपलब्ध आहेत. विनोदी लेखनाबरोबर त्यांनी गंभीर विषयावरही नाटके लिहिली आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले आहेत. उत्तम वक्ते, उत्तम संयोजक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आकाशवाणी व दूरदर्शन माध्य-मातून ‘गजरा’, ‘शृतिका’, ‘प्रपंच’ सारखे विविध कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत.

अरविंद ताटके, हे एक पुस्तकप्रेमी लेखक आहेत. चरित्र, क्रीडा इत्यादी विषयात त्यांनी विविध पुस्तके लिहिली आहेत. नेपोलियन, भावे, फडके, माडगूळकर, मोतीलाल नेहरू, पहेलगामा, खंडू रांगणेकर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांवर त्यांनी पुस्तके लिहिली असून त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या सुमारे तीस पस्तीस आहे. पुस्तक स्वतः विकत घेणे हा त्यांचा सर्वश्रेष्ठ छंद आहे. किमान पंचवीस तीस हजार रुपये किमतीची पुस्तके त्यांनी आपल्या संग्रही नमविली आहेत. पुस्तक संग्रह ही आयुष्यातील सर्वोत्कृष्ठ कमाई असे ते मानतात.

प्रभाकर दिघे, हे कळव्यास रहातात. यांनी पुस्तकांची शंभरी ओलांडली आहे. कथा-काबदंरी-मानस-शास्त्र चरित्रे – शिक्षणविषयक पुस्तके विविध त्यांनी लिहिली आहेत.

मंदाकिनी भारद्वाज, ह्या ठाणेकर साहित्यिकातील एक यशस्वी लोकप्रिय लेखिका. कादंबरी लेखन हा प्रकार विशेष आवडीचा. आज त्यांच्या नावे चौदा पंधरा पुस्तके आहेत. ठाण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘शब्दांगण’ मासिकाच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे विविध कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. उत्तम पुस्तकांचे त्यांनी अनुवादही केले आहेत.

दिवाकर बापट, शासकीय पुरस्कार चार वेळा मिळविणारे ठाण्यातील एकमेव साहित्यिक. चरित्रे, छंद, बाल वाङ्मय, कविता इत्यादी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची बाल वाङ्मयाची सुमारे पंचवीस तीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. छंद, चरित्रे या विषया-वरील पुस्तकांना सरकारी पुरस्कारही मिळाला आहे. अण्णा, पौर्णिमा, जितेंद्रिय इत्यादी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या असून जितेंद्रिय कादंबरीवरूनच नाटककार बाळ कोल्हटकर यांना ‘उघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक सुचले.

गोंविंद मुसळे, कादंबरी लेखन विशेष आवडीचे. लेखन क्षेत्रात विषयाची विविधता सांभाळण्याकडे त्यांचा कल आहे. आत्तापर्यंत पाचसहा कथासंग्रह व दहाबारा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

कृ. ज. दिवेकर, कादंबरी हा लेखन प्रकार त्यांच्या आवडीचा. सतरा अठरा पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. ओघवती भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय, नोकरीमुळे अनेक ठिकाणी फिरण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे विषयाची विविधता त्यांच्या लेखनात आढळते.

चिं. शं. जोशी, एक काळ ‘निशिगंध’ सारखे अस मोली, बहुगुणी, आतील मजकूर आणि तत्कालीन मान्यवर मासिकांनाही मागे टाकणारा अफाट खप या दृष्टीने मासिक चालवून त्यांनी सबंध महाराष्ट्रात धमाल उडवून दिली. या मासिकात अनेक मान्यवर लेखकांनी उपस्थिती लावली होती हे विशेष. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या मासिकाला ५००० वर्गणीदार लाभले होते. स्वतः जोशी उत्तम कादंबरीकार व कथालेखक आहेत. ‘स्वप्न’, ‘शतरंज’, ‘लॉलीपाप’ व ‘नवाब’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या, याशिवाय अप्रकाशित अशा अनेक कथा आहेत.

शशिकान्त कोनकर, विनोदी कथालेखक, उत्तन फार्स व नाट्यलेखक, दर्जेदार बालवाङ्मय लेखक अशा विविध साहित्य प्रकारातील लेखनामुळे सर्व ज्ञात आहेत. शिक्षण क्षेत्रातही अनेक विषयांवर ग्रंथ लेखन केले आहे.

सुरेश भार्गव मुळे, विनोदी लेखक. त्यांच्या आठ दहा पुस्तकांमध्ये बहुतेक विनोदी कादंबऱ्या आहेत. जत्रा, मेनका, मोहिनी यातून ते प्रामुख्याने लेखन करतात.

पद्माकर चितळे, कादंबरी लेखन हा आवडीचा प्रांत. सुलभा प्रकाशन नावाची स्वतःची प्रकाशन संस्था त्यांनी काढली आहे.

छाया वाड, ह्या उत्तम कथालेखिका असून, बिजली, तृप्त मी तृषार्त मी, उःशाप इत्यादींसारख्या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. दूरदर्शन, आकाशवाणीवर विविध कार्यक्रम सादर करतात. ज्ञानदीपमधून पंडिता रमाबाईंवर त्यांनी एक कार्यक्रम सादर केला होता. आकाशवाणी महिला मंडळात अनेकदा सहभाग असतो.

अशोक चिटणीस, शिक्षण क्षेत्रात उत्तम शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार लाभलेले चिटणीस उत्तम वक्ते, संयोजक व संचालक म्हणून सर्वांना परिचित आहेत. चिटणीस यांनी लेखनातही आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या दोन कादंबऱ्या तसेच अनुताई वाघ व नटवर्य मामासाहेब पेंडसे यांच्या जीवनाची ओळख करून देणारी पुस्तके ही त्यांची मोलाची कामगिरी आहे.

रमण माळवदे, विनोदी कथा लेखक. कथा कथनकार आणि वक्ते या नात्याने सर्वांना सुपरिचित. शैक्षणिक विषयांवरही लेखन केले आहे. ‘ब्रह्माक्षरं’ या पुस्तकास शासकीय पुरस्कार लाभला. याखेरीज ‘दालन’ ‘बनाटी’ ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत.

उमाकान्त कणेकर, उत्तम गीतकार म्हणून प्रसिद्ध. त्यांची अनेक गीते लोकप्रिय झाली आहेत. याखेरीज पाचसहा नाटके लिहिली असून त्यांचे ‘जखमा उरातल्या’ हे गीतकाव्य प्रसिद्ध आहे. ‘हारजीत’ इत्यादी नाटकांचे लेखक त्यांनी अनेक चित्रपटांसाठीही गीतलेखन केले आहे.

प्रा. मुकुंदराव आगासकर, इतिहास विषयक विपुल लेखन, उत्तम वक्ते, सामाजिक कार्यातही सहभाग.

दिवाकर अनंत घैसास अध्यात्मिक क्षेत्रातील विपुल लेखन, काव्य करण्याची आवड, साधारणपणे पंधरा-वीस पुस्तके प्रसिद्ध,.

अशोक बागवे, त्यांच्या ‘आलम’ या काव्य संग्रहास शासकीय पारितोषक मिळाले आहे. ‘कविता दशकाचा’ मध्येही कवितांची अंतर्भाव आहे. याखेरीज ‘असायलम’, ‘सहस्त्र वर्षाचे साचले हे काळे’ ‘आमचे येथे श्री कृपेकरून’ इत्यादी नाटके व काही एकांकिकांचेही लेखन त्यांनी केले आहे.

डॉ. ए. म. शेजवलकर, उत्सम विनोदी कथा, कादंबरी लेखक, कवी तसेच त्यांनी लोकनाट्य, फार्स या विषयातही प्रभावी लेखन केले आहे. आतापर्यंत आठ नअ पुस्तके प्रसिद्ध. दूरदर्शन व आकाशवाणीवर नाटिका, गजरा, प्रभातेमनी असे विविध कार्यक्रम सादर.

शं. म. देशपांडे – एकांकिका व नाटके मिळून बारा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

रमेश पानसे काव्याचा विशेष अभ्यास ‘रुची’, नियतकालिकाचे संपादन कवितासंग्रह प्रसिद्ध अर्थ शास्त्रावरही विपुल लेखन केले आहे.

डॉ. सुभाष मुंजे- शायरी हा हातखंडा विषय आहे. त्यांचा ‘जुगलबंधी’ हा संग्रह अलीकडे प्रसिद्ध झाला आहे.

अशी ही ठाण्यातील साहित्यिकांची धावती ओळख याखेरीज सातत्याने लेखन करणारे वा पुस्तके प्रसिद्ध झालेले लेखक ठाण्यात खूप आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. प्रा. न. र. पारसनीस, लीला जोशी, स. वि. कुलकर्णी, म. पां. भावे, स. पां. जोशी, नरेंद्र बल्लाळ, द. कृ. सोमण श्रीहरी भिडे, सुधा मोकाशी, ज. द. सिधये, चैतन्य सोनावणे, शशी जोशी, शीला मराठे, श्रीराम बोरकर, किरण आचार्य, रा. य. ओल्तीकर, प्रभाकर पाध्ये, श्री. द. कुलकर्णी, आशा साठे, प्रभू गोखले, डॉ. श्री. म. भातखंडे, चंद्रशेखर वाव, सुरेश मथुरे, द. दा. काळे, शंकर मठ, अरुण जोशी, कुमार केतकर, अंजली काळे, वि. स. महाबळेश्वर-कर, प्रकाश गीध, विजया टिळक, नीला पटवर्धन, सुधीर मोंडकर, मनोहर तोडणकर, ह. श्री. परांजपे, प्र. ग. वैद्य, प्रा. सिंधु पटवर्धन, भालचंद्र अत्रे, सुरेश म्हात्रे, अरविंद दोडे, डॉ. मुरलीधर गोडे, शांता परांजपे, विजया पंडितराव, श्री. ल. टिळक, मीरा जठार, मोहन पाठक, प्रदीप गुजर, पुष्पलता कढे, सुनंदा भोसेकर, सुरेश खोपर्डे, अश्विनीकुमार मराठे, नंदकुमार रेगे, नंदकुमार नाईक इत्यादी लेखक लेखिका यांची नांवे घेतल्याशिवाय साहित्यिक ठाणे पूर्ण करता येणार नाही.

पूर्वी ठाण्यात वास्तव्य असलेले अनेक लेखक लेखिका मराठी साहि-त्यात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी लोक-सत्ताचे संपादक, चतुरस्त्र लेखक, प्रभावी वक्ते माधव गडकरी, साहि-त्यिक, समीक्षक गंगाधर गाडगीळ, बालवाङ्मयाचे लेखक ग. बा. तथा अण्णा ताम्हणे, निरलस कार्यकर्ते आणि लेखक दत्ता ताम्हणे, संस्कृत भाषा पंडितमो. दि. पराडकर, हिन्दी-तील लेखक, समीक्षक व विचारवंत डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर आणि इतिहासावर विपुल लेखन केलेले प्रा. भगवान कुंटे ( सध्या वास्तव्य अमेरिकेत) या साहित्यिकांचा ठाणेकर अभिमानाने उल्लेख करतात.

(ठाण्यातील माहित्यिकांचा प्रस्तुत परिचय अपुरा असून काही लेखक-लेखिकांची नावे राहून गेली असणे शक्य आहे.)

— म. पां. भावे


१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री म. पां. भावे यांनी लिहिलेला लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..