हळू हळू लोक मला बऱ्यापैकी ओळखु लागले होते. माझे काव्य वाचन, कथाकथन , साहित्य, कला ,संस्कृती , माझे संत , माझी चित्रे , संतांचा कल्याणकारी स्पर्श , ज्येष्ठत्वाची जाणीव अशी अनेक विषयावरची व्याख्याने होत राहिली अजुनही होत आहेतच . संतांचा कल्याणकारी स्पर्श हे व्याख्यान आतापर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर तर सुमारे 250 वेळ झाले . मी सावित्रीबाई फुले , पुणे पुणेविद्यापीठाचा बहि:शाल शिक्षण व्याख्याताही आहे .त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक संघ तसेच अनेक कॉलेजवर माझी व्याख्याने झाली . वर्तमान पत्रात बातम्याद्वारे प्रसिद्धिही झाल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर देखील व्याख्याने झाली.
संतचित्रांचीही अनेक ठिकाणी प्रदर्शने ,स्लाईड शोही झाले . सह्याद्रि चैनल , इ टिव्ही , झी टीव्ही , या चैनलवर सन्तचित्रकार म्हणून मुलाखत झाली. पुण्यातील अनेक वृत्तपत्रामध्ये माझे लिखाण तसेच झालेल्या अनेक कार्यक्रमांची दखल घेण्यात आली.लोकमत पुणे या दैनिकात लोकमतचे पत्रकार श्री अनवर खान यांनी माझेवर ” *कलियुगातील श्रावणबाळ* या शीर्षकाखाली एक लेखही लिहिला होता याला कारण म्हणजे मी या सर्वच साहित्यिकांच्या सहवासात सतत वावरत होतो . अनेक कार्यक्रमात त्यांच्या सोबत होतो .
सप्तर्षी मित्रमंडळ पुणे ,महाकवी कालीदास प्रतिष्ठान पुणे या दोनही संस्थानच्या माध्यमातुन 12 वर्षात अनेक साहित्यिक ,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.त्या प्रत्येक कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ साहित्यिक , सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहिली होती ..योगायोगाने या दोनही संस्थाचे अध्यक्षपद सातत्याने माझ्याकडेच राहिले असल्यामुळे मला ज्यास्त कार्य करण्याची संधी मिळाली .माझ्या सोबत असलेल्या सर्वच विद्यमान व अभ्यासु , जाणकार व्यक्तीन्चा सहवास आणी मार्गदर्शनही सातत्याने लाभले .हेच विशेष महत्वाचे आहे .
वर्षभर दोनही संस्थेचे दरमहा कार्यक्रम होत असत ,तेंव्हा या भेटलेल्या सर्वच साहित्यिकांची वैचारिक मेजवानी सर्वानाच लाभत असे. संस्थेच्या प्रत्येक वर्धापनादिवशी मात्र स्थापनेपासुन ज्यांचा मोलाचा सहभाग होता मार्गदर्शन होते ते कै. डॉ. दभी . कुलकर्णी सर व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ , साहित्यिक डॉ. न.म.जोशी सर ,कै. आनंद यादव सर यांची उपस्थिती ठरलेलीच होती आणी आहे . विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ दिग्गजांनी आमच्या संस्थेच्या वर्धापनी कधीही कुठलेही इतर कार्यक्रम कधीही घेतले नाहीत किंवा कधीही संस्थेकडून कुठल्याही सत्काराची किंवा मानधनाची अपेक्षा केली नाही यावरून आमच्या या महाकवी कालिदास या संस्थेवरील त्यांचे प्रेम दिसून येते. या सर्वांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनामुळे संस्था मोठी झाली आहे. हेच त्यांचे आमच्यावरील निस्वार्थी प्रेम आमचा फार मोट्ठा मानसिक आधार आहे ..मला तर डॉ. दभी. कुलकर्णी सरांनी मानसपुत्रच मानले होते. त्यांचे तसेच डॉ.न.म.जोशी सरांचे मार्गदर्शन व आशीर्वाद म्हणजे जीवनातील सर्वात श्रेष्ठ असे पुरस्कारच आहेत असे मी मानतो. कै. द. भी. कुलकर्णी व मी जवळच रहात असल्यामुळे त्यांची माझी नित्य भेट होत असे.
या साहित्यिक कारकीर्दित आजपर्यंत माझी २३ पुस्तके प्रकाशित झाली, त्या पुस्तकांना अत्यंत सुंदर अभिप्राय व प्रस्तावनाही या साहित्य दिग्गजांनी दिल्या.माझ्या *संस्कार शिदोरी* या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला कै. दभी. कुलकर्णी सरांनी पुरस्कार दिला हे माझे भाग्य ! पण दुसऱ्या आवृत्तीमध्ये दभी. कुलकर्णी सरांनी काही अधिक माहिती लिहीण्याची मला सूचना केली होती . त्याप्रमाणे मी ते केलेही आणी ते सुमारे ६०० पेजेसचे पुस्तक प्रकाशन झाले देखील . या दुसऱ्या आवृत्तीला माझे गुरुवर्य ज्येष्ठ शिक्षण तज्ञ , ज्येष्ठ साहित्यिक मा . डॉ. न.म. जोशी सरांची प्रस्तावना लाभली आहे. प्रत्येक भागामध्ये मला भेटलेल्या साहित्यिक कवी यांचा उल्लेख आवर्जून येणार आहेच. माझ्या मुद्रण प्रकाशन या व्यवसायामुळे असा साहित्यिक सहवास मला अधिक लाभला हे मला मान्य करावे लागेलच.
©विगसातपुते
9766544908
२०-११-२०१८
(पुणे मुक्कामी)
Leave a Reply