अशा प्रकारे साहित्यिक सहवास घडत राहिला. मी सातत्याने लिहित राहिलो . माझे कार्यक्रमही होत राहिले . नवीन नवीन ज्येष्ठ साहित्यिकांचा संपर्क होवू लागला. माझा प्रकाशन , छपाईच्या व्यवसायाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात होती ..
एक दिवस मुंबईमध्ये मुद्रण व्यवसायाची फेडरेशन कॉनफ्ररन्स गोवालिया टॅन्क मुंबई येथे होती. अनेक प्रांतातून प्रिंटर्स आले होते. मीही गेलो होतो.
(मी संतचित्रांची ऑइल पेंट पोर्ट्रेट्स काढतो हे सर्वश्रुत होते) तेंव्हा कलक्त्याहून मुंबईला एका मुद्रण संस्थेचे संचालक श्री.गोयल माझेकडे आले . शिर्डी साई संस्थान मुळे व मी साई सुमिरन टाईम्स या माझ्याच मुलाच्या वृत्तपत्राचे संपादकत्व माझेकडे असल्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला होता. त्यांनी मला विचारले ” सातपुतेजी आप तो आर्टिस्टभी हो , आपने सन्तोकि पोर्ट्रेट्स बनायी है । ऐसा मैने सुना है , तो क्या आपको सप्तर्षियों के भी नाम मालूम होंगे।”
तेंव्हा मी त्यांना म्हणालो , सप्तर्षि आकाश गंगेतील ग्रह आहेत . पण त्यांची सर्व नावे मला आज आठवत नाहीत ..पण मी सांगेन तुम्हाला . म्हणून मी लगेचच माझे परम् ज्येष्ठ स्नेही कै. वसंतराव कुलकर्णी पुणे , चं. गो. भालेराव , रमेशचंद्र पाठक यांना फोन केला . पण त्यांनीही उद्या सकाळी प्रभात शाखेत चर्च्या करून सांगतो म्हणाले . मी श्री. गोयल यांना विचारले ही नावे तुम्हाला कशासाठी हवीत ? तेंव्हा ते मला म्हणाले तुम्ही मला त्यांची पोर्ट्रेट काढूंन द्या . त्याचे पैसे मी तुम्हाला देईन ..सरते शेवटी मला मित्रांच्या कडून त्यांची नावे कळली .. ! तीही चातुर्मास या मराठी पुस्तकातूनच ती म्हणजे सप्तर्षी १) वशिष्ठ २)कश्यप ३) अत्रेय ४) भरद्वाज ५) विश्वामित्र ६) गौतम ७) जमदग्नी व अरुंधती पण त्यांचे पोर्ट्रेट्स काढण्यासाठी फोटो कुठून मिळणार ? तेंव्हा मित्रासोबत झालेल्या चर्चेअंती लोणावळा येथे मनःशक्ति केंद्रामध्ये ही सप्तऋषींची माहिती उपलब्ध होईल असे कळले . मग आम्ही सारी ज्येष्ठ मंडळी मुद्दाम ट्रिप काढून मनःशक्ति केंद्रात गेलो. मला सर्व माहिती मिळाली. कालांतराने मी सप्तर्षीची 8 पोर्टरेट्स काढली देखील त्याचे मानधन मला रु.25000/- मिळाले देखील.
यातले विशेष म्हणजे या ज्येष्ठ नागरिक समुहात साहित्यिक , कवी , विचारवंत व्यासंगी अशा व्यक्ती होत्या .आम्ही रोज भेटत असू . विविध विषयावर सर्वांगी चर्च्या होत असे त्यातून सप्तर्षि मित्र मंडळ ही संस्था सुरु झाली आणी या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक , सांस्कृतिक , साहित्यिक , शैक्षणिक , प्रबोधात्मक कार्यक्रम आम्ही करीत राहिलो . त्याची अध्यक्षपदाची देखील जबाबदारी माझ्याकडेच होती . अत्यंत सुंदर उपक्रम आम्ही नेहमी राबवत होतो ..त्यातूनही समाजातील अभ्यासु साहित्यिक , व्यक्तिमत्वाचा खुपच जवळून परिचय झाला .ही गोष्ट फार महत्वाची होती .
सप्तर्षी मंडळातही कवी ,लेखक, वाचक , कलाकार , सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक मंडळी होती. तिथेही अनेक साहित्यिक , सांस्कृतिक कार्यकम आम्ही राबवत होतो . काही कार्यक्रमांना आम्ही सर्व एकत्रही जात होतो . त्यातूनच सर्वांच्याच मताने पुढे आषाढस्य प्रथम दिवसे
या दिवशी महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते .
तेंव्हा साहजिकच अशा महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करीत असताना अनेक ज्येष्ठ साहित्यिक प्रभृतींचा माझा अजून खुपच जवळून परिचय झाला ..त्यांचे मला मार्गदर्शन लाभले . साहित्यिक फ़.मु. शिंदे यांचाही एका सामाजिक संस्थेतर्फे माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला होता .अनेक नवोदित साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळवून देता आले . त्यांच्या साहित्यकृती महाकवी कालिदास जयंती दिवशी प्रकाशित करण्यात आल्या . आज पर्यन्त कालिदास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत 57 पुस्तके प्रकाशित झाली आहेत .
या संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या साहित्यिकांचा सहवास लाभला त्यांच्या बाबतीत पुढील भागात संक्षिप्त आठवणी लिहीत आहे … लेखनाला मर्यादा आहेत . या सर्वांच्या बद्दल लिहिणे म्हणजे प्रत्येकाचेच एक एक छोटेखानी पुस्तकच होईल . प्रत्येक साहित्यिकाचे एक वेगळे स्वभाव वैशिष्ट्य आहे , वेगळा बाज आहे हे मात्र खरे. !! केवळ एकच म्हणता येईल हा सारा सहवासच जीवन समृद्ध करणारा आहे.
12 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी पुणे (महाराष्ट्र) या संस्थेचा आज विस्तार वाढला असून संस्थेच्या मुंबई प्रदेश तसेच ठाणे जिल्हा या ठिकाणी शाखा आहेत. या संस्थेतर्फे सातत्याने साहित्यिक कार्यक्रम केले जातात व त्यामध्ये नवोदितांना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. हाही एक सुंदर भाग्ययोग म्हणावा लागेल.!!! या बद्दल देखील पुढील भागात लिहीण्याचा प्रयत्न करीत आहे.
© विग.सातपुते.
9766544908
१८ – ११ – २०१८.
पुणे मुक्कामी.
Leave a Reply