मुक्तांगण ही संस्था चालु करुन लहान मुलांमधील मुलपण जपण्याचा प्रयत्न करीत असताना सौ स्वाती लेले यांनी अधिक खोलात जावून तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी सखी चा मंच उभारायचे ठरवले व या कामी त्यांना त्यांच्या जीवाभावाच्या तेरा मैत्रिणींची साथ मिळाली. सखी ने कुठलीही जहिरातबाजी न करता अलिबागमधील गरजु महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना नियमीत रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. गुणवत्तेकडे विशेष लक्ष पुरवून व् अगदी निवडक कामे स्वीकारुन त्यांना पुर्णपणे तडीस नेवून या संस्थेने अनेक निराधार महिलांच्या जीवनात आर्थिक समृध्दीचं चांदणं शिंपण्यास मदत केली आहे. सखी हा अलिबाग मधील महिलांचा आतला आवाज आहे. त्यांच्या व्यथा, कथा, स्वप्ने, आकांक्षा, व् समाजात त्यांना अभिप्रेत असलेले बदल यांचा कधिही न संपणारा संग्रह आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वांना आलेली विचारशक्तीची व् निर्माणशक्तिची पालवी आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या थॅलेसेमिया या रोगाने मृत्युंचे तांडव् सुरु केले आहे. अलिबाग शासकीय रुग्णालयामध्ये सध्या या रोगाने त्रस्त असे विस ते पंचवीस रुग्ण आहेत. या रोगामुळे रुग्णाची रक्तनिर्मिति प्रक्रियाच बंद पडते व त्यामुळे शरीराचा गाडा चालविण्यासाठी या रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते. काही दिवसांनंतर अशा व्यक्तींना रक्तदाते मिळणे अवघड होवून बसते. सामान्य जनतेमध्ये रक्तदानाचे महत्व बिंबवून व सर्वांमधली विशेषतः आजच्या तरुणांमधली माणुसकी जागवून अशा व्यक्तींसाठी सतत रक्तपुरवठा करणार्यांची सशक्त फळी उभी करण्याचे काम सध्या सखी करीत् आहे. अतिशय तत्परतेने व् सेवाभावी व्रुत्तीने काम् करत असताना सखीने या रोगाबद्दल जनजाग्रुती करण्याचा आगळावेगळा उपक्रम देखील सुरू केलाय. या रोगामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या कुटुंबांना उपजिविकेची साधने मिळवून देणे, त्यांच्या मुलांना सर्वतोपरी शैक्षणिक मदत करणे, रक्तदानाचे व रक्तगट ओळखण्याचे कार्यक्रम आयोजित करणे हि कामे मोठ्या प्रमाणावर चालतात. याव्यतिरिक्त sos children’s villege यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांना भेटी देवुन तेथील अनाथ मुलांसाठी व त्यांच्या आयांसाठी गाणी, गोष्टी, गप्पा, विनोदी खेळ, व हलके फुलके अनुभव असे निखळ मजेचे व् करमणुक करणारे प्रकार घेवून त्यांच्याशी संवाद साधण्याचे व् त्यांच्या साचेबध्द जीवनांमध्ये सौख्याचे चार रंग भरण्याचे कामसुध्दा सखीमार्फत महिन्यातून एकदा केले जाते. सखीने अलिबाग शासकीय रुग्णालयाला अशाच इच्छुक रक्तदात्यांची वेळेवर माहिती पुरवून् कित्येक रुग्णांना नवसंजिवनी दिली आहे.
भविष्यातील ध्येय धोरणे
अलिबागमध्ये अशी अनेक व्रुध्द जोडपी आहेत जी व्रुध्दाश्रमात जायला हि भितात व घरीसुध्दा पुर्ण दिवस एकटे असल्याने त्यांच्या आरोग्याची व तब्येतीची हेळसांड होते. त्यांच्यावर कुठलाही आप्तकालिन प्रसंग ओढवला तरीही त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करायला कोणी नसते. अशा आजारी व् एकाकी व्रुद्धांसाठी त्यांच्या आरोग्याकडे नीट लक्ष देणारे व पुरेसे वैद्यकीय ज्ञान जाणणारे सेवक()तयार करणे ही सखीची भविष्यामधील योजना आहे.याशिवाय वयस्क व सेवानिव्रुत्त व्यक्तिंच्या मद्तीसाठी चोवीस् तास तत्पर असणारी हेल्पलाइन् सुरु करावयाची आहे.
अशाप्रकारे भिशीमंडळ किंवा कीटीपार्टीजचे ग्रुप बनविणेपेक्षा सामाजिक बांधीलकी जाणुन या महिला जे कार्य करीत आहेत ते नक्कीच स्प्रुहणीय आहे.
— अनिकेत जोशी
Leave a Reply