अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास यांनी लिहिलेली ही कविता
फुलवीले बालपण चिखलातून कमळ जसे
फुलवीले तारुण्य काट्यांतुन गुलाब जसे
प्रेरक व्यक्तिमत्त्व आपुले हृदयांत ठसे
रामेश्वराचा हा राम
सलाम अब्दुल कलाम… (१)
अवकाश संशोधनाचे तुम्ही शिल्पकार
श्रेपत्रास्त्र बनवुनी झाले स्वप्न साकार
उमेदिचे पंख देणारे तुम्ही अग्निपंखकार
भारताचा ‘मिसाइल मॅन
सलाम अब्दुल कलाम… (२)
देऊनी अग्निपंख देशा संरक्षण सिद्ध करी
महान देशभक्त ठरला भारत रत्नाचा मानकरी
रात्रंदिवस बाळगला देश विकासाचा ध्यास उरी
सामन्यातला असाम्य, मिळविला राष्ट्रपतिचा मान
सलाम अब्दुल कलाम…(३)
नव्या कल्पनानी भारलेला
आधुनिक भारताचा महानायक
कठोर परिश्रमाने झाला
अग्निबाणाचा जनक
देश अवघा तुम्हा नतमस्तक
हरपला ‘भरताचा आयकॉन’
सलाम अब्दुल कलाम…(४)
-सौ. इंदिरा दास मैत्री गार्डन, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply