बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी
वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेवूनी…१,
दूर जावूनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरिता
जग सारे ते घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता…२,
वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला तो वृक्ष
पिल्लासाठी ती गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३
शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी तो पडला होता
पिल्लामधली ती कुजबुज, असह्य दशेत ऐकत होता…४
कित्त्येक वर्षीचे जीवन त्याचे, क्षणांत भूमिगत झाले
स्थिर बघूनी पक्षी घरटे, अखेरचे ते अश्रू गळले…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply