माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबरला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता…..
— अरुणा साधू (मुंबई)
समजेना मज उमजेना ! राहू कशी तुम्हाविना ,
कशी समजावू माझ्या मना.!!
ग्रंथांच्या पानातून !चपखल त्या शब्दातून ,
जरी असती तव अस्तीत्वाच्या खाणाखुणा ,
शोधित बसते पुन्हा पुन्हा !मन माझे मानेना ,
कशी समजावू माझ्या मना. !!
शब्दप्रभू तुम्ही, शब्दांच्या सामर्थ्यातून ,
समृद्ध झाले अपूले जीवन ,
आठवणींनी व्याकुळते मन ,
शोधू कुठे हा खजिना ! कळेना,आकळेना ,
कशी समजावू माझ्या मना!!
अबोल झाले शब्द ही सारे
अबोल जाहली प्रीत आपूली !
जपते मम हृदयी प्रीतीचा खजिना
आसवेच देती साथ माझिया मना!
कळेना, कशी समजावू माझ्या मना!!
— अरुणा साधू (मुंबई)
Leave a Reply