नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – प्रस्तावना

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका “माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका सादर करत आहोत.


सर्व प्रकारच्या संस्था माणसांनी बनतात. संस्थेच्या माणसांचा परस्परांशी व बाहेरील माणसांबरोबरच्या वागणुकीवरून संस्थेविषयीचे मत, संस्थेचे कामकाज व भविष्यही ठरते. कर्मचार्‍यांचे वागणे बोलणे सुधारले, की आपोआप संस्थेची प्रतिमा उजळेल, काम चांगले होईल आणि संस्थेची प्रगती साधली जाईल या हेतूने आजकाल बहुतेक सर्व प्रकारच्या संस्था या विषयावर (ज्याला इंग्रजीत Soft Skills अशी संज्ञा आहे.) कार्यशाळा, प्रशिक्षण आयोजित करतात. माणसांचे वागणे बोलणे म्हणजे काय अभिप्रेत आहे, ते कशावरून ठरते याचा उहापोह या लेखमालेत केला आहे.

आपल्याला अभिप्रेत असणारे वागणे म्हणजे सौजन्याने, नम्रतेने बोलणे, प्रसंगी मदतीचा हात पुढे करणे व तत्परतेने मदत करणे. अशा वागण्यासाठी हुशारीच्या जोडीला सुसंस्कृतपणाचा, सज्जनतेचा आणि सद्विवेकबुद्धीचा भक्कम पाया लागतो. ही सर्व कालातीत असलेली, सगळ्या धर्मातल्या (व भाषांतीलही) संतांच्या शिकवणीत आढळणारी मूल्य आहेत. ही मूल्ये अंगी बाणवण्यात आईवडील, शिक्षक यांचे संस्कार व घरातील आणि आजूबाजूचे वातावरण यांचा सिंहाचा वाटा असतो. शिवाय शैक्षिणक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीही याला कारणीभूत असते.

आपल्या देशातील सामाजिक विषमतेमुळे तसेच प्रत्येकाच्या व्यक्तीगत कौटुंबिक परिस्थितीमुळे सर्वांवर सारखे व चांगले संस्कार होतीलच असे नाही. म्हणून संस्थेच्या हितासाठी कर्मचार्‍यांवर चांगले संस्कार करणे ही व्यवस्थापनाची मोठीच जबाबदारी आहे. संस्था संवर्धनासाठी व्यवस्थापनाने ती उचलायलाच हवी. शिवाय सतत बदलत राहणारे तत्त्वज्ञान, भोवतालची आर्थिक व सामाजिक स्थित्यंतरे या सर्वांना तोंड देण्यासाठी कर्मचार्‍यांचे सतत प्रबोधन करीत राहावे लागते.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

## सामाजिक शिष्टाचार
## Part 1

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..