नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार- वेळेचे नियोजन व व्यवस्थापन

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका

“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


संदेश दळणवळण नीट झाले तरी त्या संदेशाची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येकाने आपले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. ठरलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम होणे हे तर उत्पादकतेचं प्रमुख परिमाण आहे. आपापले काम वेळेवर पूर्ण करणे हे केवळ संस्थेच्या हिताचेच नव्हे तर आपले जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी, वेळेचा सदुपयोग करून अनेक व्याप सांभाळण्यासाठी उपयुक्त आहे. गेलेला क्षण परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षण सत्कारणी लावावा लागतो. त्यासाठी आवश्यक आहे ती कामांची क्रमवारी ठरवणे.

कामांची क्रमवारी :

घरीदारी, कामाच्या ठिकाणी, सर्वप्रकारची कामे वेळेत आटोपण्यासाठी कामाची क्रमवारी ठरवावी लागते. ती कशी ठरवायची? कोणते काम तातडीने व्हायला हवे? कोणत्या कामासाठी किती वेळ लागेल? कोणते काम केव्हा करून देण्याचे कबूल केले आहे यावर कामांचा क्रम ठरतो.

गृहिणींचा स्वयंपाक असो, वा उत्पादनाचा प्रकल्प असो, कामाच्या क्रमवारीचे तत्व सगळीकडे सारखेच लागू पडते. ठरवलेली कामे वेळच्यावेळी पूर्ण करण्यासाठी त्या कामांची यादी करून ती सतत डोळ्यांसमोर ठेवणे फायद्याचे ठरते. रोजच्या दिनक्रमात जेवणापूर्वी, जेवणानंतर, संध्याकाळी अशी रोजच्या रोज क्रमवारी करून त्याप्रमाणे कामं पार पाडावी लागतात. काही कामांसाठी इतर संस्थांच्याही वेळा लक्षात घ्याव्या लागतात. बँकेच्या वेळा, इतर संस्थातील कामांच्या वेळा, सार्वजनिक सुट्ट्या याचे सतत भान राखावे लागते.

हे भान राखून काम करत राहिल्यास दिवसाचा प्रत्येक क्षण सत्कारणी लागतो. स्वत:बरोबर दुसर्‍याचा वेळही महत्वाचा आहे हे ध्यानात ठेवल्यास दुसर्‍याचीही गैरसोय होत नाही व दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळण्याची सवय आपोआपच अंगात मुरली जाते.

कामाची चालढकल :

पहाटे उठण्यासाठी लावलेला गजर बंद करून आणखी थोडा वेळ झोपण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पुष्कळदा सर्व प्रकारच्या कामांमध्येही हेच घडते. आताच काय घाई आहे, करू नंतर सावकाश ही सर्वसाधारणपणे आढळणारी वृत्ती.. या वृत्तीला प्रयत्नपूर्वक आळा घालून प्रत्येक काम वेळच्या वेळी करण्याची मनाला शिस्त लावावी लागते. एक वेळ उद्याचे काम आज केले नाही तरी एक वेळ चालू शकते.

पण आजचे काम आजच आणि आत्ताचे काम आत्ताच करावे लागते. प्रत्येक कामाचे नुसते नियोजन करून चालत नाही, तर आयत्या वेळी अडचणी आल्यास पुन्हा आपले वेळापत्रक बदलावे लागते. दोन व्यक्तींचा कामाचा वेग सारखा असत नाही. तसेच त्यांच्या कार्यक्षमतेतही फरक असू शकतो. तेव्हा या सर्वांना प्रेरित करून ठराविक वेळात गुणवत्तापूर्ण काम करून घेण्यात व्यवस्थापनाची कसोटी लागते. परंतु सर्वांनी खालील गोष्टी अंगी बाळगल्या तर सर्वांचेच काम सुकर होते.

१) वक्तशीरपणा

२) रोजच्या कामाची यादी करणे व त्याबरहुकुम ती चांगल्या रितीने पूर्ण करणे.

३) कामांची क्रमवारी आखणे.

४) कामाचे नियोजन/पुनर्नियोजन करण्यात इतरांशी सहकार्य करावे.

५) आपण कामात फार गढलेले असल्याचा आव आणत कामाची चालढकल न करणे. जो माणूस कामात खरोखरच व्यग्र असतो त्याला सर्व कामे वेळच्या वेळी करण्यास फुरसत मिळते. तो सबबी सांगत अळं टळं करत नाही.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

## सामाजिक शिष्टाचार
## Part 5

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..