भांडी घासताना विम बार
धुणं धुताना व्हील
तिच्याच हातात दाखवतात
आणि तरीही ती
किती सुंदर हसते जाहिरीतीत…
बादशहा मसाल्याची फोडणीसुद्धा
तिच देत असते
आणि सासऱ्याच्या गुडघ्याला
मुव तिच लावत असते
आणि तरीही ती
किती सुंदर हसते जाहिरातीत…
बाळाचं डायपर तिच बदलते
आणि मुलांना
एका मिनिटात मॅगीही
तिच बनवून देते
आणि तरीही ती
किती सुंदर हसते जाहिरातीत…
बरोबर रंगवला जातो जीव त्याच्यात
आणि तिला लागीर लावली जाते
तो मात्र अफेअर करतोच
आणि माझ्या नवऱ्याची बायको म्हणत
ती किती सुंदर हसते मालिकेत….
सुजूकीची नवी कार तो चालवतो
आणि ती मुलांना सांभाळते
मागच्या सिटवर
तरीही ती
किती सुंदर हसतेच ना जाहिरातीत…
तिने ऑफिस केलं काय
किंवा बिझनेस केला काय?
जमाना हाऊस वाईफचाच आहे
अजूनतरी
हाऊसहजबंड हा शब्द
अस्तित्वात आलेलाच नाही
आणि पहा ना
ती नितीनची कविता वाचतेय
तरीही ती किती
सुंदर हसतेय नितीनच्या कवितेमध्ये…
–दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ,सांगली.
मोबाईल नंबर-7020909521. (व्हाट्स अप साठी)
Leave a Reply