समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.
दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .
चिंतामणी कारखानीस
Leave a Reply