नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी ………६

समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे.आज आपण समर्थांचे पहिले पत्र पाहूया —-

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||
परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||
नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||
यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||
आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||
धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||
तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||
देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||
उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||
या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||
आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||
कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||
तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||
उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||

महाराजांची समर्थ शेवटच्या ओवीत क्षमा मागून त्यांना सांगतात कि – “आपण प्रचंड राजकारणात तटले म्हणजे अडकलेले आहात त्यामुळे आपले चित्त अनेक ठिकाणी विभागले गेले आहे तरीही काहीही कारण (प्रसंग ) नसताना मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे त्या बद्दल मला क्षमा करावी ” ..!

–चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..