एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें
विलंब न करता क्षणाचा, जायी दुजा टोका वरती,
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते,
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी,
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply