|| हरी ॐ ||
<समलिंगी संबंध – मानसिक विकृती
समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. काही परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी आणि नैसर्गिक वाढ सातत्याने आणि निकोप प्रजोत्पादनासाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत. नाहीतर एकच लिंगी पुरुष किंवा स्त्री परमेश्वराने त्या नियंत्याने जन्माला घातली असती.
समलिंगी संबंध बदलत्या काळजीचे भयावह द्योतक असून ही मानसिक विकृती, अनैतिकता आणि गुन्हा आहे. समलिंगी संबंधाना सरकारने मान्यता देऊन कायदा केला तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. याविषयी सरकारने भूमिका न घेता गप्प रहाणे म्हणजेच आपली मूक मान्यता दर्शविणे. देशात एकीकडे स्त्रीभ्रूणहत्ये संदर्भात सरकार, डॉक्टर आणि समाजाला दोषी ठरवतो, मग समलिंगी संबंधाला मान्यता दिल्याने स्त्रीभ्रूणहत्येच्या कायदा मोडीत निघेल. एक फायदा जरूर होईल लोकसंख्या आटोक्यात राहील. समाजात बेशिस्त वाढून अराजक माजेल. अनैतिक समलिंगी लैंगीकतेने पछाडलेल्यांना कायदा आणि समाजाचे वाटोळे होण्याशी सोयरसुतक नाही. क्षणिक सुख, वासना पुर्तीचा आनंद आणि पुढारलेल्या समाजाचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यात धन्यता वाटेल.
Leave a Reply