प्रभात झाली, सुर्य उगवला
वंदू रविराजाला
मुखमार्जम अन् स्नान करोनी
लागा अभ्यासाला
सशक्त होण्या दूध प्यावे
चौरस आहार करावा
नियमित व्यायाम करत असावे
मंत्र हा आचरावा
माता-पिता अन् गुरुजन अपुले
हिनकर्ते हे जाणावे
सेवाभावे नम्रतेने
इतरांचे मन राखावे
नियमा पालन करील त्याचे
तन-मन होईल विशाल
समृद्धीचे वरदान तयाला
ईश्वर ठेवील खुशाल
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply