नेहमीप्रमाणे समुद्रावर गेलो,
संध्याकाळची वेळ होती सूर्य डुबत होता….
माझ्या दृष्टीने वातवरण सुन्न होते….
नैराश्य आले की मी नेहमी जातो….
समुद्राचा अथांगपणा आणि
तिची आठवण …दोन्ही इथेच आहेत.
माझ्या मित्राचीच ती बहीण
मी त्यांच्या घरी नेहमी जायचो. परंतु मी
आणि मित्र भटकायचो.
एके
दिवशी इथेच समुद्रजवळच्या बस स्टॉपजवळ दिसली
दुपारची वेळ होतीं ,
दोघांनाही भुका लागलेल्या होत्या.
समोरच्या हॉटेलमध्ये खाले, गप्पा मारल्या.
…आणि तेथून आमची मैत्री सुरु झाली.
वेळ मिळाला की अम्ही समुद्रवर येऊन गप्पा मारायचो.
हळूहळू ओळख वाढत गेली.
प्रेम नाही पण एकमेकांना ऐकमकांशी
बोलायला आवडू लागले.
एके संध्याकाळी तिचा हात सहजपणे हातात
घेतला, बोलता बोलता..
पण तिने तो सोडवून घेतला नाही.
आम्ही असे अनेकवेळा एकमेकांचे हात धरून गप्पा मारायचो,
तशी ती काळीसावळी ,
लहान केस परंतु वाऱ्यावर सहज भरभुरात असताना ती
खुप चांगली दिसत असे.
चार -सहा महिने झाले.
मध्ये काही दिवस ती भेटलीच नाही ,
मी पण ऑफिसच्या कामात
होतो.
मी माझ्याकडे मित्राकडे जात
होतोच.
एकेदिवशी तो म्हणाला…
वाट लागली.
अरे तुला माहीत नाही.
अरे बहिणीला ब्लड कॅन्सर आहे…
माहीत नाही तुला…
मी मनातून हबकून गेलो.
तिने मला एक शब्दानेही सांगितले नव्हते.
बरे आमची मजल फक्त एकमेकांचे
हात हातात धरण्यापर्यंतच गेलेली होती .
तशी ती खूप शाय होती ,शांत होती.
मी घरी गेलो भेटलो. तिला भेटलो
हसली विषण्ण पणे
मी समजून गेलो.
मित्राला काहीच माहित नव्हते.
शेवटपर्यंत कळलेच नाही.
अस्थी विसर्जनासाठी याच समुद्रवर आलो होतो…
त्या तेथल्या कोपऱ्यांत.
अस्थी , फुले पाण्यावर विखुरली गेली..
अस्थी ,
एखाद्या पिसाप्रमाणे पाण्यात बुडत गेल्या…
पीस कधीच बुडत नाही..
पण त्या बुडाल्या…
कारण त्या
अस्थी होत्या.
फुले मात्र लाटांवर तरंगत
होती….
आजही तो कोपरा मला
खुणावतो..
गप्पा मारायला बोलवत असतो.
आणि
मी
फक्त तेथे शांतपणे बघतो
मागे फिरतो
मन तेथेच ठेवून…..
सतीश चाफेकर
Leave a Reply