खुंटला आहे संवाद सारा
फक्त नात्यांचा फाफटपसारा
सगळे संवाद डिजिटल झाले
येता जाता फॉरवर्ड केले
नको झाल्यात भेटी गाठी
कामात आहे इतकेच ओठी
बोलायला नाही कुणालाच वेळ
मोबाईल पहा घरातच खेळ
माहीत नसतो शेजार पाजार
एकटेपणा हाच तर आजार
मित्र मैत्रिणी ऑनलाइन फक्त
मेसेज मधूनच भावना व्यक्त
सोशल मीडियावर घालायचे वाद
सगळा वेळ इथेच तर बरबाद
उठला की हातात मोबाईल हवा
कराग्रे वसते लक्ष्मी चा ट्रेंड नवा
भेटतात कधी कधी जमून सारे
असतोच एखादा सेल्फी घ्यारे
त्यातच घालवतात निम्मा वेळ
संवाद करताना टेबलावर भेळ
कधी तरी ठेवा तो मोबाईल बंद
जोपासा जरा इतर काही छंद
भाग्यवान मी तुम्ही सोबत असता
एक फोन केला लगेच येवून भेटता
–श्रीपाद देशपांडे
Leave a Reply