गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे
संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे
ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी
गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी
चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी
बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी
धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो
जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो
यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा
साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply