गदीमा आणी बाबुजींनंतर
रामायणातील गीत संपले
भावमधुर त्या भावगीतातील
भावनांचे अस्तित्व संपले ।
बाबुजीं नंतर पुन्हा एकदा
भावगीत ते स्तब्ध जाहले
देण्या संगीत स्वर्गलोकी
संगीतसुर्य यशवंत निघाले ।
संवादिनी ती तानपुऱ्यासह
आज अश्रु ढाळीत आहे
ताल हरवलाय आज तबल्याचा
विणा सरस्वतीची अबोल आहे ।
भाव मराठी भावगीतातील
आज गेले आहेत हरवूनी
गायकांच्या मधूर गळ्यातील
सूरही आज बसले रुसूनी ।
वाटते त्या संगीत सुर्यांनी
जन्म घ्यावा येथे फिरुनी
पुन्हा एकदा सजवावी मैफील
गंधर्व लोकीच्या त्या सप्तस्वरांनी ।
— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
३० आक्टोंबर २०१८