नवीन लेखन...

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे त्रेपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा

घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.

पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला “सेल्फी” म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.

हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.

याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
११.०९.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..