नवीन लेखन...

सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चार

जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सेहेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चार

बाहेर जाताना पायात चप्पल, हातात काठी, आणि छत्री घेऊन बाहेर पडावे.

जमिनीवरील दगड माती, काटे, चिखल, पायांना लागू नये, आपल्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे, म्हणून हे सर्व पहावे, असे ग्रंथकारांना सांगायचे आहे. वरवर पहाता ” एवढे काय सांगायचे त्यात, एवढे बुद्धु नाही आम्ही” असं वाटणं चुक नाही. पण अश्या अनेक जागा आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत, जिथून आपल्याला धोका संभवू शकतो.

रस्त्यावर चालताना गटारात उतरण्यासाठीचे मॅनहोल उघडे असू शकतात. रस्त्यावर जर अतिवृष्टीमुळे, हाय टाईडमुळे, नदी नाले भराव घालून बंद केल्यामुळे, किंवा आपल्याच प्लॅस्टीक पिशव्यावरील अति प्रेमामुळे जर भर रस्त्यावर पावसाचे पाणी साठलेले असेल, तर त्यातून चालण्याची रिस्क घेऊ नये, हे तर आत्ता सुद्धा सोकाॅल्ड पुढारलेल्या शहरातदेखील, आपल्याला शिकावे लागतेच आहे ना !

शास्त्रकार त्याचवेळी हे पण सांगतात, की चालताना हातात काठी असावी. (आणि सोटादेखील असावा. ) ब्रेलची काठी जर हातात असली असती तर डाॅ. अमरापूरकर कदाचित वाचले असते. गोष्ट छोटी पण लाखमोलाचा जीव वाचवणारी होऊ शकते.

काठी आणि सोटा यात फरक आहे. सोटा हा स्वसंरक्षणार्थ असावा. एखादे शस्त्र आपल्याजवळ असावे. ( कृपया मी यातून युद्धाला चिथावणी देतोय, जहालमतवादी आहे, सामाजिक शांततेचा भंग करणारे आहे, असा वकीली अर्थ काढू नये. कारण हल्ली काहीवेळा असे सोयीस्कर अर्थ काढून, समाजाची दिशाभूल केली जात आहे. ) जर कुणी समोरून आक्रमण केले तर स्वतःचे संरक्षण सुद्धा करू नये, असं कुठेही तत्वज्ञान सांगितलेले नाही. संरक्षण करण्यासाठी अगदी सोटाच हाती असावा, असं नाही, हातात जे असेल ते शस्त्र करण्याची हिंमत मात्र मनगटात हवी. मग ते साधे दप्तर असो, वा कंपासपेटीतील कर्कटक, वा टोकदार पेन्सिल किंवा नेलकटर, फाॅग डियो, डोळ्यावर मारायला रिकामा कॅनसुद्धा चालतो. काहीच नसले तर दात देखील उत्तम शस्त्र होऊ शकतात. ते देखील किडलेले असतील, तर प्रसंगी जीवाच्या आकांताने, ( मोऽठ्याऽने) ओरडणे हे देखील जीव वाचवणारे ठरू शकते.

एवढे सांगून ग्रंथकार थांबत नाहीत, जे वेंधळे आहेत, त्यांच्यासाठी खास सूचनाही करतात. चालताना दोन चार हात पुढे बघून चालावे, त्याचवेळी तेवढेच आजुबाजुला आणि डोक्यावर पण लक्ष असावे.

समोर असलेला खड्डा, मागून येणारे वाहन, बाजूने चालणारा चेन स्नॅचर, वरच्या मजल्यावरील कुंडीतील ठिबकणारे पाणी अथवा सज्ञानी पालकांच्या अज्ञानी बालकांनी बाल्कनीतून केलेली सुसु, अथवा गच्चीत उभे राहून केस विंचरत असलेल्या एखाद्या सुकेशिनीच्या सुंदरश्या केशतिंदुकाची सप्रेम भेट मिळण्याची शक्यता असतेच. ( केश तिंदुक म्हणजे विंचरलेल्या केसांची गुंतवळ ) अगदीच नाहीतर झाडावर बसलेला कावळा देखील आपला शिक्का मारायला कमी करत नाही. ही आक्रमणे जी अगदी सहज आठवली ती लिहिली. घराबाहेर पडल्यावर एवढ्या युद्ध प्रसंगाना सामोरे जावे लागते. हे ग्रंथकार त्या काळात देखील सांगताहेत.

एवढ्या सर्व प्रकारातून बाहेर पडून सहीसलामत घरी परत यायचे म्हणजे हातात काठी, कमरेला लाठी, पायात चप्पल, डोक्यावर छत्र, आणि खिशात फुल्ल चार्ज असलेला मोबाईल मित्र हवाच !

पण रस्त्याने चालत असताना दोन्ही कानात बोळे घातल्याप्रमाणे असलेली बोंबाईलच्या हेडफोनची गुंडाळी ही एखाद्याला कर्णबधीर ठरवते. मागून दिलेला हाॅर्न देखील त्याला मूकबधीरासारखा वाटतो. चुकुन मागे वळून बघितलेच तर खूप मेहेरबानी झाल्यासारखे वाटते आणि गाडी चालवणारा चालक अगदी धन्य होतो.

ती एक गांधारी डोळे असून, दिसू नये, म्हणून पट्टी बांधून बसलेली, आणि ही अवतीभवती वावरणारी कान असून, अन्य काहीही ऐकू येऊ नये म्हणून इयरफोन वापरत रस्त्याने चालताना मुद्दाम कर्णबधीर झालेली !

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..