येनां, सखये या सांजवेळी
तुजविण, एकाकीच जगलो
गतस्मृती, ओघळता नयनी
मनी, मी चिंबचिंब भिजलो
स्मृतीगंध! तो शिशु शैशवी
त्यात सदैव, सचैल नाहलो
वास्तव! सारे शुष्क जीवन
दुरावा, तुझा साहत राहिलो
सत्य! तुही भोगलेस जीवन
सारे फक्त आठवित राहिलो
सांजाळलेल्या दशदिशातुनी
आठवांना उसवित राहिलो
तनमन, झाले हळवे कातर
प्रीतासक्त मी तुझ्यात गुंतलो
येनां, सखये या सांजवेळी
तुजविण, एकाकीच जगलो
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ५८
२५ – २ – २०२२.
Leave a Reply