
संजय खान यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.’दस लाख’,’एक फूल दो माली’,’इंतकाम’,’उपासना’,’मेला’,’नागिन” सोना चांदी’,’काला धंधा गोरे लोग’हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे. अभिनयाबरोबरच संजय खान यांनी दिग्दर्शक,निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली.’महा काव्य महाभारत 1′,’जय हनुमान’,’द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान’ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली.
संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट