‘विको’ ब्रँडचे सर्वेसर्वा संजीव पेंढारकर यांचा जन्म ५ जानेवारी १९६५ रोजी झाला.
संजीव पेंढारकरांचे आजोबा केशव पेंढारकर यांचे नागपुरात किराणा दुकान होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी आपले दुकान बंद करून मुंबईत येऊन “कॉस्माटिक” ब्रँडला “केमिकलमुक्त” पर्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. असा बिझनेस करण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना केशव विष्णू पेंढारकर यांनी मुंबईत येऊन १९५२ साली ‘विको (विष्णू इंडस्ट्रीज केमिकल कंपनी) ग्रुप’ ची स्थापना केली. संजीव पेंढारकर यांचे वडील गजानन पेंढारकर यांनी त्या बिझनेसला योग्य दिशा दिली आणि संजीव पेंढारकर यांनी त्या ‘विको ग्रुप’ला मोठी उंची गाठून देण्याचे काम करीत आहेत.
‘विको ग्रुप’ने रोज वापरातील अनेक प्रोडक्ट्स निर्माण केली आहेत. त्यात वज्रदंती पावडर, वज्रदंती पेस्ट, वज्रदंती (शुगर फ्री), टर्मरिक स्किन क्रिम, टर्मरिक WSO, टर्मरिक स्किन शेव्हीग क्रिम, नारायणी क्रिम यांसारखी अनेक उत्पादने विको लॅब्सने तयार केली आहेत. विको कंपनीचे ‘विको नारायणी क्रीम’ आणि ‘विको हर्बल फेश वॉश’ ही नवीन उत्पादने भारतातच नव्हे तर जगात स्वीकारली गेली आहेत. विकोची सर्व उत्पादने त्या देशातील आरोग्य विभागाच्या आवश्यकतेनुसार विधिवत नोंदणीकृत आहेत.
कंपनीचा टर्नओव्हर ४०० कोटींहून अधिक असून डोंबिवली, नागपूर व गोवा येथे प्रोडक्शन युनिट आहेत. एवढेच नाही अमेरिका, युके, ओमान, कुवैत, बहारिन, सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, मॉरिशस, फिजी, सायप्रस, वेस्ट इंडीज आणि आइसलँड या देशांमध्ये विकोचे प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट होतात. एवढेच नाहीतर ‘विको ग्रुप’ ने त्याहून मोठी मजल मारत व्यापार, जाहीरात आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम करीत आहे. स्पर्धेच्या या युगातही आपला ब्रँन्ड अग्रणिय ठेवाणारे यशस्वी मराठी उद्योजक म्हणूनच ते पाय रोवून आहेत.
२०१७ मध्ये द नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया पुरस्कृत ‘नॅशनल ग्लोरी ऑफ इंडिया’ या पुरस्काराने संजीव पेंढारकर यांना गौरवले आहे.
संजीव पेंढारकर यांनी ‘हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर’ हे पुस्तक लिहिले आहे. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून आलंय. या काळात नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागलेत, अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नवउद्योजकांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण हे पुस्तक लिहल्याचं संजीव पेंढारकर यांनी सांगितलं. तसेच या वर्षी लॉकडाऊन काळात अक्षरश: लाखो लोकांचे रोजगार बुडाले आहेत. हे रोजगार पुन्हा सुरू व्हावेत, उद्योगव्यवसायाला उभारी मिळावी, बेरोजगारी कमी व्हावी म्हणूनच संजीव पेंढरकर यांनी एकाचवेळी ऑनलाइन रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केले होते.
संजीव पेंढारकर यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply