धरेवर अवघ्या सुरु जाहले
‘उत्तरायण आज
मकर राशीत संक्रमणकरता
झाला रवीराज
घेऊनी आला पौष मास
सण संक्रांतीचा खास
वृध्दींगत करण्या स्नेहबंध
मुखि तिळगुळाचा घास
स्निग्धता गोडवा घट्ट रुजे हा
परस्परांच्या नात्यांत
वैर नी कटूता विरुन जाई
कांटेरी हलव्यांत
संस्कार मूल्ये नारी पुजती
सुगडांच्या स्वरुपांत
परंपरेची देवघेव जणू
वाणवसा लुटण्यांत
पतंगाचा खेळही चाले
सान-थोर पुरुषात
मैत्रीचा संदेश धाडती
भिडवून पतंग आकाशांत
तिळगूळ घ्या नी गोड बोला
हा जपूया जप ह्रदयांत
सद्भावनांचा उदात्त हेतू
इवल्याशा ह्या तीळांत
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply