अरे संसार संसार, मालिकांच्या काट्यावर
आधी नारी सोफ्यावर, ब्रेकमधे मग कुकर
अरे संसार संसार, गोजीरवाण्या ह्या घरांत
एकापेक्षा एक इथे, अग्रिहोत्री जे वाडयात
अरे संसार संसार, चार दिवस सासूचा,
आहे मग कुलवधूच्या, भाग्यलक्ष्मीच्या कुंकवाचा
अरे संसार संसार, ह्याला जीवन ऐसे नाव,
पिंजरा त्याले म्हणू नये, तिथे वारसाचा ठाव
अरे संसार संसार, लज्जतदारशा मेजवानीचा
चारचौघी सुगरणींचा आणि सार्या खवय्यांचा
अरे संसार संसार, असंभवही घडण्याचा,
वादळवाट आली तरी, अनुबंध ठेवण्याचा
अरे संसार संसार, अवघाची हा संसार
सारेगमप सारखा, सूर-लय-तालावर
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply