समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई
सबळ दुर्बल ह्यांचा संघर्ष, टळत नेहमी जाई….१,
मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी
त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी….२,
ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी
हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी…..३,
मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते
देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते….४,
दिसून येतो ऊर्जा वापर, देह बुद्धी वा मनी
संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply