‘संस्कृत’ म्हणती देवांची भाषा
आहे सर्व भाषांची माता !
लागून राहिली तळमळ जीवा
आहे शिकायची फार आशा !
आहेत कठीण शब्द ब्रम्ह
उलगडण्या नाही बुद्धी प्रगल्भ !
छोटया मोठया अनेक ‘संधी’
विग्रह करता कळतं ‘समधि’ !
व्याकरणाचे प्रकार ते किती
उभयान्वयी कर्ता आणि कर्मणी !
फार होते घुसमट विचारांची
सुटता योजना भावे प्रयोगाची !
संस्कृत शिकण्याचे पडले कोडे
मास्तर मिळेना अडले घोडे !
अभ्यास करावा सुचेना काही
संस्कृत शिवाय करमत नाही !
अभ्यासाला सुलभ संस्कृत पुस्तक
शब्द उच्चारता तोंडचं बोळकं !
अर्थ मराठीत सांगेल कोणी
भाषांतर याचे करेल कोणी?
भाषांतर मालेचा शोध संपला
संकृतचा सर्च गुगलवर टाकला !
सर्चच्या दावणीला सर्व भाषा
परंतू सोडली संस्कृतची आशा !
जननी प्रसवते बहु भाषा
तिच्याच नशिबीच का निराशा?
संकृतला जगात प्रथम स्थान
भारत मिळवून देईल देशमहान !
संस्कृतचे सर्व भाषेत भाषांतर
सहज उपलब्ध नेटकर्यांना साईटवर !
हाच असेल आमचा नारा
उद्याच्या येणाऱ्या आमच्या पोरा !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply