सरदार आबासाहेब उर्फ गंगाधर नारायणराव मुजुमदार यांचा जन्म १ फेब्रुवारी १८८६ रोजी झाला.
सरदार आबासाहेब उर्फ गंगाधर नारायणराव मुजुमदार पुण्यातीलच नव्हे तर देशभरातील आदरयुक्त दबदबा असलेले व्यक्तिमत्व होते.
मुजुमदार (मूळ शब्द – मजमू (फारसी)) म्हणजे महसूल गोळा करणारा. श्रीमंत पेशवे यांच्याकडून जी आज्ञापत्रे, राजपत्रे, देणग्या, सनदा, जहागिऱ्या दिल्या जात त्यांची नोंद मुजुमदारांच्या दप्तरात होऊन त्यावर त्यांच्या सहीचा शिक्का पडल्यावर तो कागद कायदेशीर ठरत असे. इतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले. आबासाहेब मुजुमदार यांचा पुण्यातील अनेक संस्थांशी विविध पदांचा संबंध होता. भारत इतिहास संशोधक मंडळाच्याम चिटणीस पदावर ते चोवीस वर्षे कार्यरत होते. त्यांचा फारसी भाषेचाही व्यासंग होता. आबासाहेब मुजुमदार यांना चित्र, शिल्प, ताम्रपट, पोथ्या इत्यादी जमविण्याचाही छंद होता.
आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत. या मतदारसंघातून ते कायम बिनविरोध निवडून येत. त्यार काळचे ते एम.एलए एमपी होते. त्यांदचा साधेपणाआणि निष्किलंक प्रतिमा ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
शनिवारवाड्याजवळ कसबा पेठेत असलेला त्यांचा १७ व्या शतकातील वाडा आजही गतवैभवाची साक्ष देतो.
पु. ल. नी संगीताबद्दल केलेल्या लेखनात आबासाहेब मुजुमदारांचा संदर्भ दिलेला आढळतो. ‘सुरांचा राजवाडा’’ हे नामकरण पु.ल. देशपांडे यांनी या वाड्याचे केले होते. भास्करबुवा बखलेंपासून शोभा गुर्टूपर्यंत जवळजवळ पाच हजार गुणी गायक – गायिकांच्या हा वाडा साक्षीदार आहे. केवळ गाणं गाण्यासाठी नव्हे तर ते ऐकण्यासाठीही इथे बॅ. जयकर, न. चिं. केळकर, दत्तो वामन पोतदार, पु. ल. देशपांडे अशी जाणकार आणि प्रतिष्ठित मंडळी येत असत. म्हणूनच सुरांचा राजवाडा ही पु. लं.नी दिलेली उपाधी या वाडय़ाला शोभून दिसते. या वाड्यातील गणेशोत्सवाची कीर्ती देशभर पसरली होती.
पुण्यातील गणेशोत्सव हा आबासाहेब मुजुमदारांच्या वाड्यात ताल सुरांच्या साक्षीने रंगत असे आणि अनेक रसिक तृप्त होत. पुण्यात शुभकार्याची सुरवात कसबा गणपतीला अक्षत देऊन व्हायची तशी गाण्याच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाची वर्दी सर्वात पहिल्यांदा या वाड्याच्या दिंडी दरवाज्यातून आत येई आणि मग बाकीचे. मयूरवीणा, बिन, जलतरंग, सूरसिंगार, स्वरमंडळ, काचतरंग, रुद्रवीणा..अशी ४० दुर्मीळ वाद्यं आबासाहेब मुजुमदारांच्या संग्रही होती. विशेष म्हणजे ते ही सर्व वाद्ये वाजवतही असत. गाण्याला वाहिलेले २५०० ग्रंथ, एक हजार हस्तलिखिते, ५०० संदर्भ ग्रंथ असे क्वचितच कुणाच्या खाजगी संग्रहात पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी ३५ हजार दुर्मीळ बंदिशींचे डिजिटलाय झेशन करुन आबासाहेब मुजुमदारांच्या वारसांनी संगीत प्रेमींसाठी एक रत्नांची खाणच खुली केली आहे.
विविध क्षेत्रात गती असलेले आबासाहेब मुजुमदार १६ सप्टेंबर १९७३ रोजी निधन झाले.
Leave a Reply