परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं.
आपलं अवखळ पण असा आयुष्यभर अंगावर ल्यायलाही कमालीची स्थितप्रज्ञता लागते.
आपल्याला ठायी ती आहे. म्हणूनच तर आयुष्य असं सृजनशील करून सुंदर करण्याचं कसब आपल्याला गवसलं आहे. अशा पद्धतीने जर आपण आपलं आयुष्य जगत राहिलो तरच आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध होऊ शकेल. अन्यथा आपण जर दुसऱ्यांचे बोल अंगावर घेऊन जगत राहिलो तर आपले जगणे हे नुसते मरणा समान होऊन जाईल, आपली प्रगती खुंटेल. म्हणून ज्या पद्धतीने आपण घरातील लोकांना आपलं म्हणून माफ करतो त्या पद्धतीनेच या समाजाला देखील आपल्याला माफ करता आलं पाहिजे
…..म्हणजेच थोडक्यात…. सारे आपलेच बंधू !
— आरती चाळक