पावसाच्या सरीने केले ओलेचिंब,भिजविले नखंशिखांत न सोडता एकही टिंब !
कडक इस्त्रीच्या कपड्यांना पडल्या वळ्या असंख्यात,लाजतेस किती तू ती लपविण्या प्रयत्नात !
“परी” पावसात भिजता दिसतेस तू गोड,आहेत अजुनी आठवणीत ‘ते’ किती क्षण हूड !
करी हैराण वृक्षा सोसाट्याचा वारा, लता-वेली चिंबल्या शोधता पर्णांचा आसरा !
नदी, नाले, ओढे वाहती दुथडी भरून,संपविती आपुले अस्तित्व समुद्रा मिळून !
पावसाच्या पाण्याचा सळसळता किनारा,झोंबरा वारा दूर करी अंतरा !
ऋणानुबंधात अडकलो आपण ग,एकांतात नदीकाठी बसलो किती क्षण ग !
बरसल्या किती ह्या अल्लड सरी ग,मन तृप नाही झाले अजुने तरी ग !
किती ग सोडल्या कागदाच्या नावा,नाव नसलेल्या त्या मामाच्या गावा !
रोजचीच स्पर्धा “लोकलीत” दमले माझे मन,,निवांत मिळाला, तूला ओलेती बघून !
चुरगळलेल्या मनाला एकांतात भिजण्याचा,म्हणून सखे असाच असावा “वर्षा”व रोजचा !!
जगदीश पटवर्धन, वझिरा,बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply