सरोवरात कमलिनी फुलतां,
भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता,
त्याचा मनमोर नाचू लागे,–!
मोह पडे अगदी त्याला,
टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत,
वाऱ्यावरती झोके घेत,
उतावीळ एकदम तो,
झटकन तेथे आला,–!!!
ती आपल्याच नादात असे,
ना तिच्या गावी त्याचे येणे,
डुलता डुलता झुळकेबरोबरी, तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,–!!!
मोहित भुंगा जवळी येता,
गुंजारव सारखा करे,–
निरागस निष्पाप कमला,
जवळ जाऊन तो एकटक बघे,–!!
पराग कण टिपण्या आतून
भृंगराजा जरी वेडावला,–
कमलिनीचे नाजूक तन ,
पाहून अधिकच चक्रावला,–!!!
*सौंदर्याची मूस जशी,
लावण्याची खाणच असे की*,—
पुटपुटतच स्वतःशी मग तो,
म्हणे, मर्जी राखेन तुझी खाशी,–!!
पाहून त्याला ती उद्गारली,
जन्म माझा ना तुझ्यासाठी, प्रेमभावना कळते मजला,
वाहून घेतले प्रभूचरणांसाठी*,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply