मुसळधार वर्षा चालली,
एक सप्ताह होऊन गेला,
पडझड दिसली चोहीकडे,
भरुन वाहे नदी-नाला ।।१।।
काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?
हानीच दिसली ज्यांत खरी,
निसर्गाच्या लहरीपणानें,
चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।
दूरदृष्टी माझी मर्यादेतच,
विचार तिजला अल्प घटकांचा,
विश्वचालक काळजी करि,
साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply