नवीन लेखन...

सर्वात कठीण लाकुड असलेला अंजन वृक्ष

अंजन (वनस्पतिशास्त्रीय नाव: हार्डविकिया बायनाटा Hardwickia binata Roxb, कुळ: Caesalpinaceae हार्डविकिया ही शेंगांच्या उपकुटुंब Detarioideae मधील फुलांच्या वनस्पतीची मोनोटाइपिक जीनस आहे. एकमेव प्रजाती. भारत आणि बांगलादेशातील मूळ झाड आहे. विल्यम रॉक्सबर्ग यांनी थॉमस हार्डविक यांच्या नावावरून या वनस्पती वंशाचे नाव दिले.

अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोसी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान इत्यादी देशांत हा आढळतो.
(संस्कृत: अंजन, हिंदी: अंजन; इरुला: कराची, कन्नड: कम्मारा, मल्याळम: आचा, तमिळ: आचा, तेलुगु: येपी)

नैसर्गिक आढळ:

अंजनाचा वृक्ष शुष्क प्रदेशांत नैसर्गिकरीत्या आढळतो. उथळ, वालुकामिश्रित, खडकाळ जमीन याच्या वाढीसाठी पोषक असते. अंजनाची लांब मुळे (Roots) जमिनीत खोलवर शिरून खडकांच्या भेगांमधून लांबवर पसरतात. त्यामुळे पाण्याशिवायही झाड व्यवस्थितपणे जिवंत राहू शकते. भारतात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, तमिळ नाडू येथे आढळतो. हे कोरड्या ते उथळ, खडबडीत मातीत वाढू शकते. भारतात, हे पश्चिम हिमालयात १५०० मी आणि मध्य आणि दक्षिण भारतातील कोरड्या खुल्या जंगलात आढळते. दक्षिण भारतात, हे विशेषतः कडप्पा, नेल्लोर जिल्ह्यांमध्ये आणि कावेरी आणि भवानी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आढळते

वर्णन:

अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे शुष्क पानझडीच्या वनांत आढळतो. हार्डविकिया बिनाटा हे झुबकेदार फांद्या असलेले मध्यम आकाराचे ते मोठे झाड आहे. झाडाची साल राखाडी-तपकिरी रंगाची असते, खोल भेगांसह खडबडीत असते आणि वयानुसार ती गडद होते. कंपाऊंड पानांमध्ये फक्त दोन पत्रके असतात जी पायथ्याशी जोडलेली असतात. लहान, पांढरी/हिरव्या-पिवळ्या रंगाची फुले अस्पष्ट असतात आणि सहज दुर्लक्षित होतात. फळे लहान, सपाट शेंगा सुमारे 6 सेमी लांब असतात ज्याच्या शेवटी एकच बीज जोडलेले असते. एप्रिलमध्ये पाने गळतात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन पाने येतात. फुलांचा हंगाम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असतो, फळे फुलांच्या हंगामानंतर दिसतात आणि मे पर्यंत टिकतात.

खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने संयुक्तपर्णी, द्विदल म्हणजेच दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात. आपटयाच्या पानासारखी दिसतात. अंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे २५ – ३५ मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे १२ – १५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची, एकाआड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून २-६ सेंमी. लांब आणि २-३ सेंमी. रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, हिरवट-पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येतो. या वृक्षाच्या शेंगा ६ – ९ सेंमी. लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते. ते टोकाकडून बाहेर पडते.

अंजन आणि कांचन एकाच कुळातील असल्यामुळे प्रथमदर्शनी दोघांमधे गफलत होण्याची शक्यता असते. परंतु कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहित पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही पर्णिका एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोडल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या या पर्णिका साधारणपणे 2.5 ते 7.5 सेमी लांब असतात. फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची व सहज नजरेत न भरणारी असतात. फुले हिवाळयात येतात. शेंगा चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक बी धारण करणाऱ्या असतात.

हार्डविकिया बिनाटा हे झुबकेदार फांद्या असलेले मध्यम आकाराचे ते मोठे झाड आहे. झाडाची साल राखाडी-तपकिरी रंगाची असते, खोल भेगांसह खडबडीत असते आणि वयानुसार ती गडद होते. कंपाऊंड पानांमध्ये फक्त दोन पत्रके असतात जी पायथ्याशी जोडलेली असतात. लहान, पांढरी/हिरव्या-पिवळ्या रंगाची फुले अस्पष्ट असतात आणि सहज दुर्लक्षित होतात. फळे लहान, सपाट शेंगा सुमारे 6 सेमी लांब असतात ज्याच्या शेवटी एकच बीज जोडलेले असते. एप्रिलमध्ये पाने गळतात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन पाने येतात. फुलांचा हंगाम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असतो, फळे फुलांच्या हंगामानंतर दिसतात आणि मे पर्यंत टिकतात.

हंगाम:

अंजनवृक्षाची एप्रिलमधे पानझड होऊन मे ते ऑगस्ट दरम्यान झाडाला नवी पालवी फुटते. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर हा अंजनाच्या फुलण्याचा काळ असतो. यानंतर लगेचच फळे तयार होऊन ती पुढील हंगामापर्यंत झाडावर टिकतात.

उपयोग:

1. धागे: अंजनाच्या सालीपासून मिळणाऱ्या धाग्यांपासून बळकट दोर तयार करतात. ह्याचा हत्तीला पकडण्यासाठी उपयोग होतो.
2. चारा: पानांमधे साधारण ९% प्रथिने असतात, त्यामुळे जनावारांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापर केला जातो.
3. इमारतीचे लाकूड: भारतात मिळणाऱ्या लाकडांच्या प्रकारांपैकी अंजनाचे लाकूड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनाचे लाकूड प्रामुख्याने शेतीची उपकरणे, बैलगाड्या, चाके व इमारतींच्या बांधकामासाठी वापरले जाते.
4. इंधन: जळणासाठी तसेच कोळसा तयार करण्यासाठी अंजनाचे लाकूड उपयोगी आहे.
5. हार्डविकिया बिनाटा पासून मिळवलेल्या लाकडाचा उपयोग कार्ट चाके, तेल गिरण्या, मुसळ आणि नांगर यांसारखी शेती उपकरणे बनवण्यासाठी केला जातो.
6. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते.
7. पाने, रसाळ देठ आणि डहाळे पशुधनासाठी चारा म्हणून काम करतात. सालामध्ये पारा शोषण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे आणि काही विशिष्ट परिस्थितीत पाण्यातील बहुतेक पारा काढून टाकण्यासाठी झाडाची साल उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
8. हार्टवुड लाकडापासून काढलेले ओलिओ-रेझिन वार्निश तयार करण्यासाठी वापरले जाते.
9. हार्टवुडमधून बाहेर पडणारी राळ हत्तींच्या फोडांवर मलमपट्टी करण्यासाठी वापरली जाते.
10. बाल्सम, क्यूब्स एकत्र करून, ल्युकोरिया, क्रॉनिक सिस्टिटिस, गोनोरिया यांसारख्या लैंगिक संक्रमित रोगांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो.
11. झाडापासून मिळणारे रेझिन (ओलिओ-रेसिन नाही) हे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून वापरले जाते. (Diuretic)
12. अंजन या वृक्षाचा पाला गुरे खातात. तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घरबांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते.
13. झाडापासून मिळणारे लाकूड हे सर्वात कठीण आणि जड आहे (भारतात आढळणाऱ्या झाडांच्या लाकडांपैकी), टिकाऊ आणि दीमक प्रतिरोधक आहे.

सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वापर:

मानसोल्लासा किंवा अभिलाषितार्थचिंतामणी या ज्ञानकोशीय ग्रंथानुसार प्राचीन काळी हार्डविकिया आणि नारळापासून बनवलेल्या दोऱ्यांचा वापर हत्तींना पकडण्यासाठी केला जात असे. या विश्वकोशाचे श्रेय इसवी सनाच्या बाराव्या शतकात राज्य करणारा पश्चिम चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा याला दिलेला आहे. संगम कवींनी हार्डविकियाचा उल्लेख आणि वर्णन केले आहे . संगम साहित्यानुसार हत्तींना हार्डविकियाची साल आणि गोड वासाचे तेल आवडते. हार्डविकियाचा उल्लेख वाल्मिकी रामायण/कंबा रामायणातील सुंदर कांडम मध्ये देखील आहे, ज्याचा उल्लेख अशोकवनम मधील एक वृक्ष म्हणून करण्यात आला आहे जिथे सीतादेवीला सिम्पसुपा (अम्हर्स्टिया नोबिलिस) अंतर्गत बंदिवासात ठेवण्यात आले होते. ह्यास राक्षस राजा रावणाचे झाड असेही म्हणतात.

साधारणपणे अंजन व अंजनी हे दोन्ही एकाच आहेत असा समज होतो. परंतु अंजन म्हणजे Hardwickia binata व अंजनी म्हणजे Memecylon umbellatum. अंजनीची फुले निळी असतात. तर अंजनाची फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची व सहज नजरेत न भरणारी असतात. अंजन वृक्ष २०-३० मीटर उंच असतो. २-३ मीटर खोडाचा आकार असतो. अंजन वृक्षास फेब्रुवारी ते जून दरम्यान याला फळे व फुले येतात. फुले गुच्छामध्ये निळसर गुलाबी रंगाची येतात. फळे गोलाकार गुलबस रंगाची असून कालांतराने गडद जांभळ्या रंगाची बनतात. अंजनी हे झुडूप (shrub) प्रकारातील झाड आहे. व अंजन हा पर्णपाती वृक्ष आहे.

रासायनिक घटक:

कार्बोहैड्रेट्स, प्रोटिन्स, अमिनो ऍसिड, स्टिरॉइड्स, ग्लीकोसिडस, फ्लॅवेनॉइडेस, लिपिड, टॅनिन्स, हे अंजनाच्या वृक्षाचे महत्त्वाचे रासायनिक घटक आहेत. ह्यात सर्वात जास्त मॅग्नेशिअम आढळते. ह्यात जिवाणू प्रतिबंधक, तसेच सूज कमी करण्याचे गुण आहेत.
असा हा बहुगुणी पण दुर्लक्षित पण महत्वाचा वृक्ष.

संदर्भ:

१. गुगल वरील या विषयावरील अनेक लेख
२. मराठी विकिपीडिया.
३. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०
८. ११. २०२४

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on सर्वात कठीण लाकुड असलेला अंजन वृक्ष

  1. नेहमप्रमाणेच सर्वांग सुंदर लेख ……पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा…….

  2. तुमची ही लेखमाला खूप छान आहे.भरपूर माहिती मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..