आजपर्यंत ससा आणि कासव यांच्या मध्ये पळण्याच्या अनेक शर्यती झाल्या होत्या. पण या शर्यतीत पैकी दोन शर्यती खूप खूप गाजल्या. पहिल्या शर्यतीत कासव आणि ती शर्यत जिंकून सस्याचे गर्वहरण केले होते. आळस हा माणसाचा प्रमुख शत्रू आहे आणि झोप की दारिद्र्याची सोयरी आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले होते. तर दुसऱ्या शर्यतीत सशाने सावधानता, संयम, सचोटी हे गुण अंगी बाणविले. हे गुण एखाद्याच्या अंगी असतील तर त्याला जीवनामध्ये त्याच्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही अडथळा आणू शकत नाही हे सशाने दाखवून दिले. सशाने दुसरी शर्यत फार मोठ्या फरकाने जिंकली होती. यानंतर मात्र हळूहळू त्यांच्यातील शत्रुत्व संपुष्टात आले. आता ससा आणि कासव यांची चांगलीच मैत्री जुळली होती.
त्यांच्यात दररोज खूप गप्पा सुरू झाल्या. अलीकडे तर ते दोघे एकमेकाला आपल्या स्वतःच्या खाजगी आयुष्यातील सुखदुःखाच्या गोष्टी सांगायला लागले होते. एकमेकाला मदतीला धावून जाऊ लागले पुढे पुढे तर त्यांना एकमेकांशिवाय अन्नही गोड लागेनासे झाले. दररोज सकाळी सोबतच फिरायला जाणे सुरु झाले व्यायाम करणे, अभ्यास करणे, वर्गात काय शिकवले यावर चर्चा करणे, त्यांच्या गृहपाठाच्या वह्या एकमेकाला देणे या गोष्टी त्यांच्यात सुरू झाल्या.
आताशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते एकत्र जाऊ लागले. रस्त्याने जाताना कुणा अंधाला, म्हातार्या व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत कर, कोणाचे औषध आणून दे कुणाला बाजारातून भाजी आणून दे कुणाला पाणी भरायला मदत कर. गरजूंना रक्तदान करायचे असेल तर ते रक्तदान ही एकत्र करायला लागले…. कुठे परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू असेल तर त्या कामात मदत कर ती सुद्धा एकत्रितपणे अशी त्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली होती तीही पण एकत्रित येऊन.
आज 25 जानेवारी. उद्या भारतीय प्रजासत्ताक दिन. संध्याकाळच्या वेळेला बाजारामध्ये फेरफटका मारण्यासाठी ससा आणि कासव एकत्र निघाले. चौकात आले. आज त्यांना चौकातले वातावरण प्रसन्न दिसले. सगळीकडे रंगीबेरंगी दुकाने थाटलेली त्यांना दिसू लागली. कपड्यांच्या दुकानावर तर कित्ती तोबा गर्दी !!! गणवेश खरेदीसाठी अनेक मुले-मुली आई-वडिलांच्या सोबत आलेली होती…. त्यांनी पाहिली…. काही फेरीवाले सुद्धा चौकांमध्ये उभे होते. ते या दोन मित्रांच्या नजरेतून सुटतील नवलच!! हो की नाही ? ….त्यांनी पाहिले आज या फेरीवाल्यांकडे विक्रीसाठी आणलेले प्लास्टिकचे झेंडे पाहिले. काय…!! आणि कासवाच्या पोटात पाणी शिरले…. त्याच्या मनात आलेली शंका त्याने सशाच्या कानात सांगितली…ही ही शंका ऐकून सशाने ही त्याचे लांब लांब कान टवकारले…. कासवाने आणखी काहीतरी सशाला त्याच्या कानात हळूच सांगितले…. यावर कासवाने आपली मान हलवली आणि होकार भरला….ते आता वेगळ्याच मोहीमेवर निघाले होते…!!! रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येक पालकांना या प्लॅस्टिकच्या वस्तू हे प्लास्टिकचे झेंडे खरेदी न करण्याचे आवाहन करण्यास त्यांनी सुरुवात केली. शासनाने प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याची केलेले आदेश याबाबत त्यांनी पालकांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक पालकांना तो मुद्दा पटला त्यांनी हा मुद्दा आपल्या लेकरांना समजावून सांगितला.आणि प्लास्टिकचे झेंडे खरेदी न करण्याचे मुलांना सुद्धा सांगितले. पण काही काही मुले जरा हट्टी होती त्यांच्या पालकांचे ते जरा जास्तच लाडकी दिसली…कारण एवढे समजून सांगितल्यावरही त्या पालकांनी प्लास्टिकचे ध्वज खरेदी केलेच केले. काही पालक जरा जास्तच हौशी होते. तर काही पालक हटवादी होते. त्यांनीही या सदस्यांचे म्हणणे यावर कानाडोळा केला आणि प्लास्टिकच्या झेंड्याची जोरदार खरेदी केली.
दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळीच उठले. आज दिवसभर त्यांना त्या शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरून फिरायचे होते. प्रत्येक सिग्नल, प्रत्येक शाळा, प्रत्येक शाळेचे प्रांगण, रस्त्याच्या कडेला असणारे फूटपाथ, नाल्या यांचा त्यांना शोध घ्यावयाचा होता. कारण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आनंद आणि देशप्रेम प्रकट करण्यासाठी तिरंग्याच्या रंगाचे मंडप उभारले जातात. तिरंग्या रंगाच्या पताका लावल्या जातात. ही सर्व सजावट करण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सिग्नल वर, चौकामध्ये फेरीवाले प्लॅस्टिकचे लहान-मोठे तिरंगि झेंडे विक्री करतात. सायकल वर लावण्यासाठी किंवा गाडीवर लावण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. काही लोक आपल्या छातीवर लावण्यासाठी पिण्याने दोस्ता येतील असे थोडे जाड प्लॅस्टिक वापरलेले झेंडे उत्साहाने खरेदी करतात.
एकदा का परेड, ध्वजारोहण, राष्ट्रगीत यांची सांगता झाली की या सर्व झेंड्यांचे प्लास्टिकच्या कचऱ्याचे रुपांतर होते. हा कचरा एकाच शहरात दोन दोन टनांपेक्षा कमी वजनाचा नसतो. आकाराने लहान लहान असणारे प्लास्टिकचे झेंडे एकत्र गोळा होत नाहीत वाऱ्याच्या झुळकीसोबत ते शाळेच्या मैदानावर, रस्त्यावर, फूटपाथवर, नाली मध्ये सर्वत्र पसरत जातात. या प्लास्टिकच्या लहान-मोठ्या वस्तूही तिरंगी रंगात बनवून विकली जातात. गरज संपली की त्याही वस्तू फेकून दिल्या जातात अनेकांच्या पायदळी तुडवली जातात. किती हा घोर अपमान त्या राष्ट्र ध्वजाचा…..!! त्याच सोबत पर्यावरणाची केवढी ती हाणी…!!!
म्हणून ससा व कासव आणि ठरविले की हे सर्व इतस्ततः असलेले झेंडे स्वतः गोळा करायचे. या प्लास्टिकच्या कचर्याचे योग्य व्यवस्थापन करायचे. कारण लोकांना शब्दांची भाषा समजत नाही जणू असे लोक वागतात….. सकाळी दहा वाजेपासून कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली…… त्यांची ही कृती पाहून रस्त्याने जाणारे मुले मुली आणि इतर मंडळी त्यांच्या कामात मदत करू लागली….. केक गम यांच्या गटात सामील होत होता….. दोनाचे दोन हजार स्वयंसेवक कधी झाले हे कोणालाही कळले नाही आणि संपूर्ण शहरातला कचरा अवघ्या दोन तासात गोळा करून झाला….. आता त्या शहरातली प्रत्येक नाली, प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक सिग्नल, प्रत्येक चौक आणि प्रत्येक रस्ता स्वच्छ दिसत होता.
हे सर्व हे ससा आणि कासव यांच्या आई-वडिलांनी निरीक्षण केले होते… काल पासूनच त्यांच्या आई वडिलांची त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर होती…. दोघेही घरी परतले तेव्हा त्यांच्या आईने त्यांची आरती ओवाळून स्वागत केले….. खूप मोठा सत्कार समारंभ झाला….. त्यानंतर ससा आणि कासव एकत्र पंचपक्वान्न चे जेवण खात होते….. आणि तिकडे सनईचे सूर ऐकू येत होते….. धन्य तो ससा आणि धन्य तो कासव !!!!!
— श्रीपाद यशवंतराव देशपांडे, परभणी.
9421083255
Shripad1765@gmail.com
Leave a Reply