नवीन लेखन...

सतत DOING व्हर्सेस काहीवेळ BEING !

धेडगुजरी भाषेबद्दल क्षमस्व ! पण मनातला FLOW त्याच्या मार्गाने यावा.

स्वतःच्या “बाहेर ” असलेल्या असंख्य गोष्टींशी आपण दिवसभर जोडलेले असतो, सतत काहीतरी सुरु असते- फोन, काम, ड्राइविंग, वाचन, गप्पा, कार्यालयीन काम, बाग /चित्रपटगृह येथे परिवाराबरोबर वेळ घालविणे.

सकाळी उठल्यापासून ही बाह्यविश्वाशी जोडणी अखंड,अव्याहत सुरु असते. अगदी झोपतानाही व्हाट्सअँपवरील ताजे संदेश बघूनच (झोपेसाठी आणि दुसऱ्या दिवशी उठण्यासाठी) डोळे “मिटतात”. शांततेला किती हद्दपार केलंय आपण? जबरदस्ती असते का सतत कशा ना कशात व्यग्र राहण्याची आपणावर की ती आपणच नकळत स्वतःवर लादली आहे? वेळ जावा म्हणून, वेळ जात नाही म्हणून काही ना काही दिवसभर सुरूच ! यातल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण त्या नाही केल्या तरी चालेल. आमच्या अभियांत्रिकी भाषेत VA (Value Added ) आणि NVA ( Non-Value Added) अशा दोन activities असतात. दिवसाचा बराच हिस्सा (“फुकट “वेळ मिळालाय म्हणून) आपण “फुकट ” आणि NVA मध्ये घालवत असतो कां ?

सारखे DOING करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी BEING साठी आपण राखून ठेवतो का?

याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. काही न करणे या कल्पनेनेच काहीजणांना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. ” बॅरिस्टर ” मधील लाल अलवण नेसलेली मावशी (विजयाबाई ) म्हणते – “मी रोज सकाळी विहिरीवरून घागरी भरून ठेवते आणि संध्याकाळी ओतून देते.”

आपणही आपला दिवस असाच “भरून “ठेवत असतो का?

शांततेशी, निःशब्दतेशी,निरवतेशी आपल्याला कसे जुळवून घेता येईल? ते कुठे शिकायला मिळेल ?

माझे उत्तर एकच- एखादे कौशल्य (स्किल) आपण कसे विकसित करतो ?- प्रॅक्टिस/प्रॅक्टिस/आणि फक्त प्रॅक्टिस !

हे ऐकायला किंचित विचित्र वाटू शकते, पण गेली काही वर्षे मी “काहीतरी करणे बंद करायचे आणि दिवसातील काहीवेळ फक्त स्वतःजवळ असणे जगायचे, गप्प बसायचे-चिडीचुप्प ” हे करतोय. व्यवसायाचा भाग म्हणून प्रशिक्षणात वगैरे यथेच्छ बडबडतो पण घरी,प्रवासात निःशब्द राहण्याचा प्रयत्न करतो. स्वतःशीही बोलणे कमी करत आणलेय. इतरांशी बोलण्याचा कंटाळा यायला लागला आहे. अत्यावश्यक नातेवाईक/मित्रपरिवाराशी आणि व्यवसायाशी संबंधित बोलणे करायचे अन्यथा NVA कमी करायचे हा प्रयत्न जमू लागलाय हळूहळू ! मस्त वाटतं, आतला कोलाहल मंदावत जाताना जाणवतो. मोघ्यांचा भाषेत-” मनाचिया घावावर मनाची फुंकर ” मस्त वाटते.

यासाठी करावे लागणारे प्रयत्न कदाचित एखाद्याला आवडणार नाहीत पण अंतिमतः हे सुखासीन/आरामदायी वाटतं.

थांबा,मी मौन/ध्यान या वरच्या आध्यत्मिक पायऱ्यांविषयी बोलत नाही. फक्त दिवसभरात ५-१० मिनिटे स्वतःजवळ असण्याबद्दल बोलतोय.

शांतता हे खूप प्रभावी हत्यार आहे,विशेषतः शिणल्यावर,थकवा आल्यावर स्वतःमध्ये थोडी ऊर्जा भरून घेण्यासाठी !

मी करतोय, तुम्हीही करून बघा नं ?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..