नवीन लेखन...

सॅटेलाईट फोन

सॅटेलाईट फोन हा एक प्रकारचा मोबाईल फोनच असतो, पण तो सेल साईट्सच्या ऐवजी उपग्रहांना जोडलेला असतो. त्याच्या मदतीने आपण नेहमीचे फोन कॉल्स करू शकतो, शिवाय एसएमएस व कमी तरंगलांबीवर आधारित इंटरनेट अशा सेवा त्यावर उपलब्ध आहेत. संपूर्ण पृथ्वीवर कुठेही या फोनचा वापर करता येतो, कारण तो भूस्थिर उपग्रहाच्या मदतीने चालतो. काही काळापूर्वी सॅटेलाईट फोनचा आकार मोठा होता, पण आता तो आपल्या नेहमीच्या मोबाईल किंवा स्मार्टफोन इतकाच आहे.

अंटार्क्टिका किंवा दूरस्थ प्रदेशातील मोहिमांमध्ये सॅटेलाईट फोनचा चांगला उपयोग होतो. ‘लो अर्थ ऑर्बिट’ म्हणजे कमी उंचीवरच्या उपग्रहांचा वापरही यात करता येतो, पण त्यात तरंगलांबीची विविधता कमी असते. एसीइएस, इमानरसॅट, थुरया, एमसॅट, टेरेस्टार, आयको कम्युनिकेशन्स, इरिडियम, ग्लोबलस्टार यांच्याकडून सॅटेलाईट फोनची सुविधा पुरवली जाते. सॅटेलाईट कॉल्स तुलनेने महाग म्हणजे मिनिटाला ०.१५ डॉलर ते २ डॉलरपर्यंत पडतात.चिलीचा भूकंप, हवाईतील भूकंप, कतरिना वादळ या दुर्घटनांत या फोनच्या सेवेचा चांगला उपयोग करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबई हल्ल्यासारख्या दहशतवादी कारवायातही त्याचा वापर करण्यात आला होता. भारतात परवानगी घेऊन सॅटेलाईट फोन वापरता येतो.

सॅटेलाईट फोनच्या मदतीने ६० केबी ते ५१२ केबी इतक्या वेगाचे इंटरनेट मिळते. सॅटेलाईट एक फोनचे वैगुण्य म्हणजे त्यात एकमेकांचे बोलणे उशिरा ऐकू येते. कारण संदेश पहिल्यांदा उपग्रहाकडे जातो, नंतर तो पृथ्वीवरील गेटवेकडे येतो व तेथून रिसीव्हरकडे पोहोचवला जातो. यात बराच वेळ जातो, पण त्याचा फायदा असा की, अतिशय दुर्गम ठिकाणीही असलेल्या प्रियजनांशी तुम्ही बोलू शकता. इरिडियम, ग्लोबलस्टार व थुरया या तीन सॅटेलाइट फोन नेटवर्कमध्ये ‘इरिडियम’ हे कमी उंचीवरील उपग्रहांचा वापर करते, त्यामुळे संभाषण एकमेकांपर्यंत लवकर पोहोचते.

महासागरांसह सर्व पृथ्वीवर या नेटवर्कचे फोन व्यवस्थित चालतात. ग्लोबलस्टारने पृथ्वीच्या ८० टक्के भागात सेवा दिली आहे तर थुरयाचे कार्यक्षेत्र हे आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व व युरोप हे आहे. ज्यांना नेहमी सॅटेलाईट फोनची गरज नाही, ते तो भाड्याने घेऊ शकतात. त्यासाठी आठवड्याला ४० डॉलर पडतात पण त्यात टॉक टाईम धरलेला नाही. यात इरिडियमचे फोनसेट महाग (१२७५ डॉलर किंवा त्याहून अधिक) असतात कारण त्याचे कार्यक्षेत्र फार विस्तीर्ण आहे. महाग असल्याने जुने सॅटलाईट फोन विकत घेणे परवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..