नवीन लेखन...

साठी बुध्दी..

महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले,

प्रधानजी साठीझाली की काय होतं हो..

बुध्दी नाठीहोते महाराज, असं कुणीतरी कधीतरी आणि केव्हातरी म्हंटलेलं असावं .
कुणी म्हणजे, थोरल्या महाराजांच्या आजोबाश्रींचे हे सत्य वचन आहे.
म्हणजे मगप्रश्नच उरला नाही महाराज. सत्य  वचनाची परंपराआपल्या घराण्यासारखी अलम दुनियेत कुठेच नाही महाराज हे काय आम्हास ठाऊक नाही..पण महाराज आज आपणास साठीच आठवन कां बरे होतेय..
प्रधानजी माझीसाठी कधी  होतेय याचीवाट बघतोय मी. म्हणजे नाठीच्या नावाखाली निवृत्ती स्वीकारायला आणि एक्सपर्ट कमेंट करायला मोकळे होऊ..

महाराज असंकाही बोलू नका. तुमच्या शिवाय राज्य म्हणजे तेला  शिवाय अरब..
प्रधानजी कायम्हणायच तुम्हाला..

ते मला सुध्दा कळलं नाही महाराज. पण, तुम्हाला आज साठीचा विचार  कां  बरे सतावतोय  हो.
प्रधानजी तेमी सांगतोच ,पण तुम्ही मला सांगा की शोभा डे किंवा दे मॅडम ह्यांचं काय  बरं वयअसावं.
महाराज , अहोमहाराणी साहेबांनी हे ऐकलं तर त्या रुसून -फुगून  बसतील हो. साठी व्हायच्याच आधी तुमची बुध्दी नाठी झाल्याचे बघून त्या धाय मोकलून आक्रोश करतील.
प्रधानजी, गैरसमजकरुन घेऊ नका . तुमच्या  डोक्यात कोणता  किडा वळवळलाहे कळण्याइतपत मी दुधखुळा नाही हो प्रधानजी.

क्षमा असावीमहाराज, आम्हाला जे वाटले ते तुमच्या  मनी नाहीहे ऐकून  किती समाधानवाटले म्हणून सांगू तुम्हांस.
ते  काही  सांगू नकाप्रधानजी, फक्त सांगा की शोभा डे किंवा दे मॅडम यांचं वय किती असावं?
महाराज त्यांनीकधीचीच साठी पार केलीय..
म्हणूनच म्हणूनचप्रधानजी त्यांची बुध्दी नाठी  झालीय  हो..
काय झालेहो महाराज.
प्रधानजी, थोरल्यामहाराजांचे आजोबाश्री चुकूच कसे शकतील याची खात्री पटली आता..
आम्ही समजलोनाही हो  महाराज,
प्रधानजी  साठी बुध्दी नाठी  नसती तरडे किंवा दे मॅडम यांनी, त्या ज्या मोहल्यात राहतात त्या मोहल्ल्याचे स्वतंत्र राज्य करा अशी मागणी नसती  का  केली..
करेक्ट  महाराज करेक्ट..महाराज त्या साठीच्या पलिकडे आणि सत्तरीच्या अधेमध्ये आहेत हो..
हो कातरीच..तरीच ..
काय तरीचमहाराज?
प्रधानजी,त्या साठीच्या आणि सत्तरीच्या अध्येमध्ये आहेत म्हणूनच त्या ज्या मोहल्ल्यात राहतात त्या मोहल्ल्याला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्याचं सुचलं नाही हो त्यांना..
खरच कीमहाराज.. प्रधानजी महाराजांच्या तर्कदुष्ट बुध्दीला दाद देत उद्गारले.

— सुरेश वांदिले 

Avatar
About सुरेश वांदिले 11 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..