सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. १९७६ मध्ये सतीश पुळेकर यांची चांगुणा’ नाटकातून कारकिर्दीला सुरवात झाली. यात सतीश पुळेकर आणि रोहिणी हट्टंगडीनं काम केलं होतं आणि या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. ‘आविष्कार’ या संस्थेकडून हे नाटक रंगमंचावर आलं होतं. या नाटकाचे दिग्दर्शक होते जयदेव हट्टंगडी. त्या नंतर सतीश पुळेकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केली. सख्खे शेजारी, पुरुष, कुणी तरी आहे तिथे, करार, प्रकरण दुसरे, दुर्गाबाई जरा जपून व चल थोडे एन्जॉय करू ही त्यांच्या कारकिर्दीतील ठळक नाटके आहेत. प्रकरण दुसरे या नाटकासाठी सतीश पुळेकर यांना नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
१९९२-९३ साली आलेल्या ‘करार’ या नाटकात सतीश पुळेकर यांची दुहेरी भूमिका होती. आणि त्या भूमिकेसाठी सगळेच पुरस्कार मिळाले. ‘करार’ हे नाटक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्यांची ‘येडा’ ‘अभिमन्यू’ हि नाटके खूप चालली. ‘हॅपी बर्थ डे’ हे नाटकही खूप सुंदर सादर केलं गेले.
‘येडा’ चित्रपटाने सतीश पुळेकर यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी दादासाहेब फाळके यांच्या नातवाने सुरू केलेल्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ हा चित्रपट पण खूप गाजला. ‘युथ’ आणि ‘पोलिस लाइन’ या चित्रपटात काम केले आहे.
सह्याद्री वाहिनीवरच्या ‘लाइफ मेंबर’ व ‘चिरंजीव’ या त्यांच्या दोन मालिका खूप गाजल्या होत्या. चित्रपटांमध्ये “सांगाती”, “काय राव तुम्ही” , “आभरण”, “चार्ली”, “येडा”, “आम्ही चमकते तारे”, “श्री पार्टनर”, “गोळा बेरीज”, “फक्त लढ म्हणा”, “आरम्भ”, “आटापिटा”, “वैकेशन”, “मी मन आणि ध्रुव”, “बे दुने साढ़े चार”, “विश्वास”, “सार कस शांत शांत”, “हळद रुसली कुंकु हसली”, “अत्याचार” प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply