(सत्तेची खुर्ची एक वेगळी मजबूत होती. चार पायांवर भक्कम उभी होती. आताची खुर्ची – ?)
एक खुर्ची चार पाई
भक्कम मजबूत एके ठाई
एक खुर्ची तीन पाय
एक गळाला कळलं नाय
एक खुर्ची दोन पाय
दोन गळाले, खुर्ची तर हाय
एक खुर्ची एक पाय
काय बिगडलं फिरती हाय
कुटं बी वळीवलं तर
काय बी बिगडत नाय
आजकाल अशाच खुर्चीची
तर राव चलती हाय!
— विनायक अत्रे.
Leave a Reply