भगवद्गीतेत वारंवार त्रिगुणा बद्दल सांगितलेले आहे. सात्विक, राजसी व तामसी. देवाला आपण पाया पडतो तेव्हा आपल्यातील सात्विक भाव एकवटून सकारात्मक विचार घेऊन शरण जात असतो. हिच सकारात्मकता, सात्विकता त्या ठिकाणी एकवटते. स्थान महत्व याचसाठी आहे.
भाविकाला आपल्या देवाच्या ठिकाणी सेवा करायची इच्छा असते. पण तो काय करेल यावर त्याने ठरविलेल्या मर्यादा असतात. देवस्थान व्यवस्थापकानी भाविकाला त्याला जमेल अशा सेवा उपलब्ध केल्या व सेवा देण्याची संधी दिली तर तो आनंदाने स्विकारतो व अशी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापक व देवाचे आभार मानतो.
तरूणाईला आपल्या श्रध्दास्थानी त्याना आवडेल, रुचेल, पचेल अशा सेवा द्यायला आवडत. सेवा अनेक प्रकारच्या असू शकतात. स्त्रोत्रपठण, स्त्रोत्रे शिकविणे (१५०+ स्त्रोत्रे तरी आहे. स्त्रोत्र पठनाने उच्चार सुधारतात व मानसिक समाधान मिळत.) आपल्यातीलच काहि युवक युवती छान उच्चारासह तालात स्त्रोत्र म्हणतात. कलागुण सादर करणे. ठराविक जागा, वस्तू रंगवणे. शारीरिक श्रमात ठराविक काळाने स्वच्छता ठराविक जागा परिसर वगैरे.
सोशल मिडियाचा वापर करून देवस्थान व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या सेवांचा निर्देश करून आपल्या भाविकांचा लक्षात आणून देऊ शकते, सांगू शकते. योजनाबद्ध आखणी करून अनेक भाविकांना सेवा देण्याची संधी प्राप्त करून देऊ शकते. भाविकांच्या सात्विक, सकारात्मक उर्जेमुळे देवस्थानातील सात्विकतेत भरच पडेल.
देवस्थान कमिटीने भाविकांना प्रोत्साहन देऊन तरूण भक्तगण सातत्याने देवस्थानात कसे पोहोचतील अस कार्यक्रम आखावे. वयस्करांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानाचे व्यवस्थापन तरूणानीच सांभाळलेले उत्तम. हाय आयक्यू (high IQ) तरूणाई देवस्थानातील सात्विकतेत भर घालेल, देवस्थान परिसर ताजा-तवाना राहिल.
— श्रीकांत बर्वे
Leave a Reply