नवीन लेखन...

सात्विक सुखानंद

साहित्यसंगीतकलाविहिन: ।
साक्षातपशु:पृछयविषाणहीन: ।।
तृणं न खादन्नपि जीवमान-
स्तदभागधेयं परंम पशूनाम ।।

(ज्या माणसापाशी साहित्य , कला , संगीत इत्यादी कलापैकी काहीच नसते ती व्यक्ती शेपूट किंवा शिंग नसलेला पशुच असतो. फक्त गवत न खाता तो जगत असतो हे पशूंचेच भाग्य म्हटले पाहिजे.)

सृष्टीत मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ मानला आहे. सुखदुःख संवेदनां, सर्व षड्रिपु यांची सतर्क जाणीव प्रत्येक जीवाला असते. पण या सर्वातून फक्त भौतिक सुखाचीच स्वार्थी लालसा आज जास्त जाणवते. मुळामध्ये भौतिक, क्षणिक सुखसुविधांची कल्पनाच मुळी सर्वार्थाने चुकीचीच आहे.

सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.

जगात इतरांशी निष्पाप , निर्मळ भावनिक अशी वैचारिक विवेकी , देवाण घेवाण करणं! मनामनाला सांधत जाणं! माणसं जोडत जाणं हे खरंच अविनाशी असं सुंदर सत्यसुख असतं! परस्पर भावनिक , प्रेमळ , आपलेपणाची जवळीक निर्माण करणारी जाणीव होणं हीच मानवी जीवनाची सुंदर कृतार्थ अशी समृद्धता आहे.

नेहमीच मनांतराला सुखानंद देणाऱ्या गोष्टींचाच हव्यास न करतां आपल्या मनाला आवर घालून , मुरड घालून आपल्याला फारशा न आवडणाऱ्या गोष्टीत देखील जर आपण विरोध न करता थोडासा रस घेतला आणी मने जपण्याचा प्रयत्न केला तर अगदी सहज एकमेकांतील मतभेद दूर होणार नाहीत कां?

सर्जनशीलता म्हणजे निर्मितीची क्षमता . आणी अशा संवेदनशील सर्जनशीलतेचे अथक प्रामाणिक प्रयत्न त्या कलावंताला , कलाकाराला नेहमीच ब्रह्मानंद देतात.

म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये कला, संस्कार , संस्कृती , साहित्य अशा सकल कलांना महत्व आहे. आणी या सर्वच कला व्यक्तीला आत्मानंद देत असतात. म्हणूनच संवेदनशील साहित्यलेखन , काव्यलेखन , वाचन , मनन, चिंतन , वक्तृत्व , चित्रकला , गायन , वादन , नृत्य , इत्यादी सर्वच कलांमधून सुंदर मनमोहक कलाकृती साकार करणारी मन:प्रवृत्ती , कलेचा छंद जोपासणे हीच आत्म्याची सुंदरता असते!

ही साहित्य ,कला , संस्कृती अनादीकालापासून अस्तित्वात असून त्यामधून जीवन मूल्यांची अभिव्यक्ती जाणीव होत असते. त्यामुळे या सर्व कला सदैव अस्तित्वात असणारच आहेत. त्यातून स्वानंद मिळत रहाणार आहे!

हाच प्रगल्भ विचार म्हणजेच सात्विक मनभावनांचा सात्विक सुखानंद!

इती लेखनसीमा

— वि.ग.सातपुते.(विगसा)

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..