सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, कोण आणतो सांगा आचरणी, –!!!
असत्याच्या आधाराने,
हिंसक, मारक, वर्चस्वाने,
वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे”च निराळी,-!
स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
सगळे स्वैराचाराचे भक्त,
माणसाचे वागणे नि:सत्व,
गांधींच्या तत्वांना तडा जाई,–!!
सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
घर , गाव शहर परिसरां,
“अस्वच्छ” बघा किती ठेविती,–!!!
बोलू बघू ऐकू नका ,
असे सांगती तीन माकडे,
कोण पाळते तत्त्वांना या,
गिरवती अनिती”चेच धडे,
माणूस म्हणुनी माणसाला,
किंमत मुळी ना देती,–!!!
हिमगौरी कर्वे.
Leave a Reply