सांज क्षितीजी थबकता
रंगले आभाळ भावनांचे
शिंपण, अंतरी अमृताचे
मनी भास ते अमरत्वाचे…
उजळलेली तिन्हीसांजा
आविष्कार, कृतार्थतेचे
जरी ही गात्रे पांगुळलेली
शांत मनात भाव मुक्तीचे…
जीव ! स्मृतीत गुंतलेला
नाद अंतरी टाळमृदुंगाचे
मन, सारे विठ्ठल विठ्ठल
संकीर्तनी सत्य शाश्वताचे…
यावीण दूजे सुख कोणते
अहोभाग्य जन्मोजन्मिचे
तोच सावळा एक कृपाळू
अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे…
–वि.ग.सातपुते (भावकवी )
9766544908
रचना क्र. २०५
१७/८/२०२२
Leave a Reply