तू विसावलीस क्षणक्षण जेथे
तो वृक्षही तुझीच वाट पाहतो
पानोपानी तुझा स्पर्श लाघवी
अजुनही अविरत झुळझुळतो
शहारणारा, मस्त धुंद गारवा
तनामनाला, अलवार झोंबतो
तू अशी ही कोमली नार सुंदरा
तुझ्या रुपात, माहोल शृंगारतो
नको नां, आता खेळू जीवाशी
त्या वृक्षातळी मीही वाट पाहतो
जीवनी, प्रीती एक ब्रह्मसुखदा
साक्षात्कार, जीवाजीवा भावतो
नाते अगम्य राधेचे अन मुरलीचे
सत्यभास, अंतराला सुखावितो
— वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. १७९
२७/७/२०२२
Leave a Reply