नवीन लेखन...

सत्यकाम

सत्य हे नेहमीच पोरकं असतं
माझ्या जीवनात जर तो आला नसता
तर कदाचित मीही हे मानलं नसतं
पण… तसं व्हायचं नव्हतं

अजूनही मला तो आठवतो आहे
उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा
आणि हो, त्याचे डोळे!
त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते
तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत
तुमच्याशी संवाद साधायला लागायचे

सत्याबद्दल त्याला अपार आदर होता-असीम निष्ठा होती
आदर्श जगाबद्दल काही कल्पना होत्या त्याच्या
पहिल्या भेटीत मी काहीच बोललो नाही

नंतरच्या भेटीत त्याच्या डोळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला
त्याची मूल्यांवरची निष्ठा अटळ होती
मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला
पण…. त्याने मानलं नाही

त्यानंतर तो अनेकदा भेटला
नेहमी काहीतरी आदर्शवादी बोलायचा
सगळंच काही लक्षात राहणं शक्य नव्हतं पण
त्याचे ते विलक्षण बोलके डोळे मात्र सतत जाणवायचे

असाच एकदा भेटला असताना
मिळालेल्या नोकरीविषयी उत्साहाने बोलत होता
मी त्याला आदर्शवादी भूमिका सोडून द्यायला सांगितली

तडजोडीचा व्यावहारिक अर्थ समजावला… पण
त्याने दुर्लक्ष केले
त्याला सत्यकाम बनायचं होतं
तेव्हाच मला त्याच्या गंभीर भवितव्याची कल्पना आली
पण तरीही; त्याच्या डोळ्यातील तेजस्वीपणाचा मला हेवा वाटला

मध्यंतरी त्याला नोकरीवरुन हाकलण्यात आल्याचं समजलं
‘सत्यकाम’च भूत त्याला अद्यापि छळत होतं
एका खटल्यातही त्याला गोवण्यात आलं होतं
त्याबद्दल त्याला मी नंतर हटकल्यावर
‘पराभव मान्य!’
एवढंच बोलून तो गप्प झाला
कदाचित ओठांतून व्यथा ओसंडेल म्हणून
ओठ घट्ट आवळून घेतले होते त्याने
आपली निराशा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यानं
पण; आपले डोळे विलक्षण बोलके आहेत
हे मात्र तो विसरला

त्या नंतरच्या भेटीमध्ये, त्याच्या डोळ्यातील तेज
अस्तंगत होत जाणं पहाणंच माझ्या नशीबी होतं
असेच काही दिवस गेले, आणि…
अचानक ‘ती’ बातमी कानांवर आदळली
झालं ते अटळ असूनही मला खूप वाईट वाटलं
जीवनभर सत्याच्या पाठी धावणाऱ्या वेड्याला
सत्य नेहमी पोरकं असतं हे कटू सत्य उमगलं नव्हतं
आणि अशाप्रकारे सत्य अखेरीस पोरकंच राहिलं
आणखी एका आहुतीनंतरही…!

— यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..