आजकाला थोडेच व्यक्त होण्यात मजा आहे
इथे उगा व्यर्थ वाचाळपंचविशिचे वावडे आहे
सर्वार्थीच हितावह मंत्र , मौनं सर्वार्थ साधनम
आज इथे कुणाचेच कुणाला काय पडले आहे
संसारी रोज रोज नवनवीन समस्यांचे कोड़े
चिंतित जीवाला नित्य सामोरी जायचे आहे
विज्ञानयुगी कालचेही आज कालबाह्य ठरते
जगणे आज सर्वार्थांने सर्वापुढे आव्हान आहे
केवळ पैशानेच कां ? सुखाचे रांजण भरती
अंतरिची निर्मल निष्पाप भावना सुखदा आहे
निःसंकोची साथ मानवतेची आधार स्पंदनाना
हा सत्यार्थ जीवनाचा उमजण्यात विवेक आहे
**********
–वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. 322
7/12/2022
Leave a Reply