भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. हा अलंकार हाताचे सोंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातात घालण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात हिरव्या बांगड्याना विशेष मान आहे. यालाच “चुडा” असेही म्हणतात.
खरतर पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या हातात कायम हा अलंकार असे. काळानुरूप याचे महत्व फक्त सणावारी राहिले आणि आता रोज शक्य नाही.
तरीही मोठमोठ्या कार्यक्रमांत बांगड्या अजूनही आवर्जून घातल्या जातात.अतिशय सुंदर असा हा अलंकार आहे.
बांगड्या घालण्यामागे वैज्ञानिक आधार ही आहे. या अलंकारामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत नाही असं म्हटलं जातं. त्याच बरोबर हातातल्या बांगड्या मनगटावर घर्षण पावल्यामुळे ऊर्जा निर्माण होते परिणामी अशक्तपणा जाणवत नाही. तसेच श्वासासंबंधी व हृदया संबंधी कोणतेही आजार होत नाहीत. थोडक्यात सौंदर्य वाढवण्या बरोबरच स्त्रियांचे मानसिक संतुलन ही राखले जाते.
बांगड्यांना ओटीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. असा हा पूर्णतः स्त्रीत्व मिरवणारा सुंदर अलंकार आहे.
Leave a Reply